anand mahindra talk about tulip wind turbine | दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने सर्वजण हैराण झाले आहेत. यासोबतच विजेच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचे ओझे वाढले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका मशीनबद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही तुमच्या घरावर लावली तर तुमचे विजबील थेट शुन्य होईल.
हे मशिन घरात बसवल्यानंतर तुम्हाला बाहेरून वीज विकत घेण्याची गरज भासणार नाही. कारण हे मशिन स्वतःच वीज निर्माण करण्यास सक्षम आहे. हे पाहून महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनाही ही मशीन खुपच आवडली आहे. तसेच त्यांनी त्या मशीनचा व्हिडिओही शेअर केला आहे.
ट्युलिप विंड टबाईन असे या मशीनचे नाव आहे. ट्यूलिप विंड टर्बाइन एक विशेष प्रकारचे मशीन आहे जे रिकाम्या जागी किंवा घराच्या छतावर बसवले जाते. हवा जेव्हा येते तेव्हा त्या मशीनीचे पंख फिरु लागलात. तो पंखा फिरतो आणि त्यातून विज निर्मिती होते. त्यासाठी तुम्हाला बाहेरुन कोणत्याही प्रकारच्या वीज कनेक्शनची गरज भासत नाही. तसेच ट्युलिपमध्ये वेगवेगळे रंगही उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही त्याला घराच्या डेकोरेशनचा भागही बनवू शकतात.
आनंद महिंद्रा यांनीही या मशीनचा व्हिडिओ शेअर करताना त्याचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले की मला हे बघून आश्चर्य वाटले की इतक्या कमी जागेत आणि इतक्या कमी उंचीवर ट्युलिप विंड टबाईन बसवणे शक्य आहे. उर्जा निर्मिती करण्यासाठी अशा पर्यायांचं स्वागत केलं पाहिजे.
https://twitter.com/anandmahindra/status/1583383766235766785?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1583383766235766785%7Ctwgr%5E60700d948fe8792200314aaad9d8c0ada54ee526%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livemint.com%2Fnews%2Findia%2Fwatch-anand-mahindra-shares-video-of-innovative-wind-turbines-says-ideal-for-india-11666405609239.html
ट्यूलिप टर्बाइन ही भारतासाठी खुप उपयुक्त गोष्ट आहे. हे कमी किमतीत, कमी जागेत आणि शहरी-ग्रामीण या दोन्ही ठिकाणी वापरले जाऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की पूर्वीच्या काळात वीज निर्मितीसाठी टर्बाइनचा वापर केला जात होता. आजही ते अनेक ठिकाणी वापरले जातात.
आनंद महिंद्रांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर फक्त ८ तासांत त्याला १८ लाखांहून अधिक लोकांनी बघितले आहे. तसेच त्याला साडे सहा हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सध्या सोशल मीडियावर हे ट्विट खुप व्हायरल होत असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहे.
महत्वाच्या बातम्या-
BJP : बड्या नेत्याचा भाजपला घरचा आहेर, म्हणाला, २०२४ ला भाजपला महाराष्ट्रात पराभवाला सामोरे जावे लागेल
shivsena : पुन्हा दगा! उद्धव ठाकरेंच्या ‘या’ लढाऊ वाघिनीचे थेट ठाकरेंवरच खळबळजनक आरोप, शिवसेनेत खळबळ
ED : दुसऱ्या आरोपींना चहा प्यायला नेतात, ते डबे खातात, मग संजय राऊत…; कोर्ट ईडीच्या वकीलांवर भडकले