महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत, त्यामुळे त्यांचे अधिक फॉलोअर्स आहेत. आनंद महिंद्रा सतत वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट करत लोकांना आकर्षित, प्रभावित करतात आणि त्यांच्या कामाने चर्चेत राहतात. नुकतेच ते चर्चेत येण्याचे कारण ठरत आहे, त्यांनी ट्विटर वरती शेअर केलेला व्हिडिओ.
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये गुरसौरभ नावाची व्यक्ती एका सामान्य सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतरित करताना दिसत आहे. या व्हिडिओद्वारे गुरसौरभने जुगाड इलेक्ट्रिक सायकलच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगितले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी खूप कौतुक केले आणि व्हिडिओमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
व्हिडिओ शेअर करताना, त्यांनी ट्विट केलं की, गेल्या काही दिवसांपासून तो सिग्नलवर फिरत आहे. सायकलमध्ये मोटर लावणारे हे जगातील पहिले उपकरण नाही, पण यामध्ये काहीतरी खास आहे ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे आहे. असे त्यांनी सांगत त्याचे वैशिष्ट्ये देखील सांगितले आहेत.
आनंद महिंद्रा यांनी तिच्या वैशिष्ट्यांचे कौतुक करताना सांगितले की, या इलेक्ट्रिक सायकलमध्ये उत्तम डिझाइन, कॉम्पॅक्ट, चिखलात चालणे, खडबडीत रस्त्यावर सनसनाटी चालणे, अत्यंत सुरक्षित, फोन चार्जिंग पोर्ट अशी वैशिष्ट्ये आहेत. तसेच लिहिले की, हे उपकरण व्यवसाय म्हणून यशस्वी होईल किंवा नफा देईलच असे नाही, पण या उपकरणात गुंतवणूक करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब असेल.
https://twitter.com/anandmahindra/status/1492388336316551170?t=Q7ONdbnKjESX4LP5ICIj6g&s=19
आनंद महिंद्राने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, या ‘अपनी स्वदेशी सायकल’ची बॅटरी 20 मिनिटे पँन्डल केल्यानंतर 50% चार्ज होते. हे उपकरण सायकलला कमाल 25 किलोमीटर प्रतितास वेग देते. शिवाय, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, ते 40 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते आणि 170 किलोग्रॅमपर्यंत वजन पेलू शकते. तसेच हे उपकरण खूप मजबूत आहे. अग्नी, पाणी आणि चिखलाचाही त्यावर काहीही परिणाम होत नाही. मोबाईल चार्जिंगचीही सुविधा या उपकरणात आहे.
https://twitter.com/anandmahindra/status/1492388385008222208?t=iaN4gvf1sPogasrZ6jZZRg&s=19
आनंद महिंद्रा या उपकरणाने इतके प्रभावित झाले की त्यांनी यामध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. आपल्या ट्विटमध्ये इच्छा व्यक्त करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, व्यवसाय म्हणून यशस्वी होईल किंवा नफा मिळेल हे आवश्यक नाही. पण या उपकरणात गुंतवणूक करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असेल. आनंद महिंद्रा यांनी हे उपकरण बनवणाऱ्या गुरसौरभला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आनंद महिंद्रा आपले वचन पाळतात हे सर्वांना माहीत आहे. आता गुरसौरभचे हे उपकरण लोकांमध्ये किती लोकप्रिय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.