Share

कंटाळलेल्या सुरक्षा रक्षकाने खराब केली ७ कोटींची पेंटिंग; आनंद महिंद्रांनी दिली भन्नाट रिऍक्शन, म्हणाले..

anand mahindra

रशिया शहरातील बोरिस शलोत्सवमधून एक वेगळच प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी आर्ट गॅलरी भरवण्यात आले होते. एका सुरक्षा रक्षकाची निवड करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे त्याचा पहिला दिवस होता.  दिवसभर सुरक्षा रक्षकाचे काम करुन तो कंटाळला होता. पण त्या नादात त्याने असा पराक्रम केला की सगळेच जण हैराण झाले.

त्याने कोट्यवधींच्या पेटींगवर पेनाने चित्र काढून पुर्ण पेंटींग खराब केली आहे. या प्रकरणावर महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांनी एक उपाय सुचवला आहे. चिंता कशाला करायची? असा सवाल महिंद्रांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.

ट्विट करत महिंद्रा म्हणतात, “चिंता कशाला करायची? हे नवीन ‘क्रिएशन’ एनएफटीमध्ये कनव्हर्ट करा,” असं ट्विट आनंद महिंद्रांनी केले आहे. तसेच सिक्युरिटी रक्षक ने आज ७ कोटी ५२ लाख रुपयांच्या पेटींगवर त्याने पेनाने डोळे काढले होते. जेव्हा बँडने विचारले की त्याने असे का केले होते, तेव्हा त्याने सांगितले की त्याचा कामाचा पहिला दिवस होता आणि त्याला खुप कंटाळा आला होता.

दरम्यान, हे प्रदर्शन ७ डिसेंबर रोजी येल्ट्सिन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले. यावेळी कंटाळलेल्या सुरक्षा रक्षकाने पेंटींगवर बॉल पेनचे डोळे काढले. तेव्हा प्रदर्शन बघणारे लोक तिथे येत होते. त्यावेळी त्यांनी बघितले की तो सुरक्षा रक्षक बॉल पेनने त्या पेंटींगवर डोळे काढत होते. त्यानंतर तातडीने तिथल्या आयोजकांना बोलवण्यात आले आहे.

गार्डची ओळख उघड झाली नसली, परंतु या लापरवाहीमुळे, सुरक्षा कंपनी यांनी त्याला ताबडतोब कामावरून बाहेर काढले. ही पेंटींग १९३२ ते १९३४ दरम्यान रशियन पेंटर ऍना लेपोर्स्काया द्वारा बनवण्यात आली होती. आता या पेटींगला नीट करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च लागू शकतो असे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी सुरक्षा पुरवणाऱ्या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या या सुरक्षारक्षकाचे नाव सांगण्यात आलेले नाहीये. मात्र त्याचं वय ६० वर्ष असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आता या व्यक्तीला कामावरुन काढून टाकण्यात आल्याच समजत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
कट्टर शिवसैनिकावर आलीये वाईट वेळ, हळद-कुंकू विकून भरतोय पोट, वाचा ह्रदयद्रावक कहाणी
घटस्फोटाच्या दिवशीच खासदाराने १८ वर्षीय मुलीशी केले तिसरे लग्न, लग्नाचा फोटोही केला पोस्ट
रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा टीझरने जिंकले सर्वांचे मन, या दिवशी चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
इशान किशन ठरला लिलावातील सर्वात महागडा खेळाडू, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now