Share

स्वप्न पुर्ण करण्यासाठी रस्त्यावर धावणाऱ्या प्रदीपची मदत करण्यास महिंद्रांचा साफ नकार; म्हणाले, तो एक…

रात्रीच्या वेळी नोएडाच्या रस्त्यावर धावणाऱ्या प्रदीप मेहराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. या तरुणाचे सर्वजण कौतुक करत आहेत. आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील प्रदीप मेहराचे कौतूक केले आहे. (anand mahindra on pradip mehra)

आनंद महिंद्रा यांनी त्या तरुणाचे कौतूक करत त्याला आत्मनिर्भर म्हटले. आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असतात. तसेच ते अनेकदा व्हायरल होत असलेले व्हिडिओ शेअर करत असतात किंवा त्यावर ते प्रतिक्रिया देत असतात. आता त्यांनी प्रदीपच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी रविवारी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण रात्री नोएडाच्या रस्त्यावर धावताना दिसत आहे. कापरीने व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यासोबत लिहिले की, त्याने त्या तरुणाला लिफ्ट देण्याचा प्रयत्न केला, पण त्याने नकार दिला. लिफ्ट घेण्यास नकार देण्याचे कारण जाणून सर्वजण त्या तरुणाच्या प्रेमात पडतील असेही त्यांनी लिहिले आहे.

https://twitter.com/anandmahindra/status/1505817462633234433

त्यानंतर एका वापरकर्त्याने व्हायरल व्हिडिओ पोस्ट केला आणि आनंद महिंद्राला टॅग केले आणि तरुणाला काही प्रकारे मदत केली जाऊ शकते का? असे विचारले. महिंद्राने हे रिट्विट केले आणि लिहिले, हे खरोखर प्रेरणादायी आहे. तो खुप स्वतंत्र आहे आणि तो लिफ्टला नाकारतो हे फॅक्ट आहे. त्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही. तो आत्मनिर्भर आहे.

दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये, जेव्हा तरुणाला विचारले की तो काय काम करतो, तेव्हा त्याने सांगितले की तो नोएडा सेक्टर-१६ मध्ये असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये काम करतो. त्याला सैन्यात भरती व्हायचे आहे. नोकरीमुळे त्याला धावायला आणि सराव करायला वेळ मिळत नसल्यामुळे तो घरापर्यंत धावून त्याची भरपाई करतो.

त्याने सांगितले की नोएडा सेक्टर-१६ पासून त्याचे घर १० किमी दूर आहे आणि तो दररोज अशा प्रकारे घरी जातो. त्यामुळे त्याचा सरावही होतो आणि वेळेची कमतरताही दूर होते. व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर लाखो लोकांनी तो पाहिला आहे. क्रीडा जगतातील हरभजन सिंग, केविन पीटरसन यांसारख्या दिग्गजांनाही प्रदीपवर प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-
विधानसभा निवडणूकीत दमदार कामगिरी अन् आमदाराला लागली राज्यसभेची लॉटरी; बनणार सर्वात तरुण सदस्य
‘या’ महिला क्रिकेटरने मध्यरात्री जडेजासाठी केले होते १२ ट्विट; म्हणाली, ‘उद्या सकाळी पुलमध्ये भेटू’
RRR मोडणार सर्व रेकॉर्ड? चित्रपटाचा पहिला रिव्ह्यु आला; पाहणारा म्हणाला, ‘हा चित्रपट आग लावणार’

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now