सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली इडली तयार करणारी ‘इडली वाली अम्मा’ सगळ्यांनाच माहिती आहे. मजुरांना पोटभरुन जेवण मिळावे म्हणून एवढ्या महागाईच्या काळातसुद्धा अम्मा आपली इडली फक्त १ रुपयाला विकते. अम्माच्या या कामाची दखल थेट उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली होती.
आनंद महिंद्रा यांनी इडली अम्मा’ला नवीन घर देण्याचं वचन दिले होते. हे वचन त्यांनी आज मातृदिनाच्या दिवशी अम्मा’ला घर देऊन पूर्ण केले आहे. तामिळनाडूमध्ये १ रुपयात इडली खाऊ घालणाऱ्या अम्माला आज स्वतःच हक्काचं नवीन घर मिळाले आहे.
‘इडली अम्मा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या तामिळनाडूच्या कोयंबतूर जिल्ह्यात राहणाऱ्या एम. कमलाथल म्हणजेच अम्मा ८५ वर्षांची आहे. ती तिच्या परिसरात काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांना आणि इतरांना अवघ्या १ रुपयात इडली खाऊ घालते.
महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी स्वत: ट्विटरवर इडली अम्माला नवीन घर मिळाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, ‘मदर्स डेच्या दिवशी अम्मा यांना इडली गिफ्ट करण्यासाठी वेळेवर घर पूर्ण केल्याबद्दल आमच्या टीमचे खूप खूप आभार. अम्मा ही पालनपोषण करणारी, काळजी घेणारी आणि निस्वार्थी आईचं मूर्त रूप आहे. तिला आणि तिच्या कार्याला पाठिंबा देणे हे आमचे सौभाग्य आहे. तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा!’ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटसोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी इडली अम्मा आणि महिंद्राचा संबंध कसा सुरू झाला हे सांगितले आहे.
व्हिडिओ लिंक
https://twitter.com/anandmahindra/status/1523169808925216770?t=4m2y4xxnCpoPbKfdwXvWlw&s=19
वास्तविक, आनंद महिंद्रा यांनी १० सप्टेंबर २०१९ रोजी ‘इडली अम्मा’ चा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावेळी त्यांनी ‘इडली अम्मा’च्या व्यवसायात गुंतवणूक करून तिला लाकडाच्या स्टोव्हऐवजी भारत गॅसचे कनेक्शन देण्यात आले होते.
यानंतर जेव्हा महिंद्राची टीम ‘इडली अम्मा’ला भेटायला पोहोचली तेव्हा त्यांनी नवीन घराची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेचा आदर करून आनंद महिंद्रा यांनी त्यांच्यासाठी नवीन घर बांधण्याचे आश्वासन दिले. महिंद्रा लाईफस्पेसेसने लगेचच त्यावर काम सुरू केले. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या घराच्या बांधकामासाठी जमिनीची नोंदणी झाली होती. आज मातृदिनाच्या दिवशी, इडली अम्माला तिचे नवीन हक्काचे घर मिळाले, ज्यात एक खास स्वयंपाकघर देखील बनविण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
..म्हणून भारतात मोटारसायकल जास्त विकल्या जातात, महिंद्रांनी दिलेले उदाहरण पाहून खळखळून हसाल
…तर मी १४ दिवस काय १४ वर्षे पण तुरुंगात राहायला तयार आहे; नवनीत राणा मुख्यमंत्र्यांवर भडकल्या
“राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही, पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही”
महाआरतीला गैरहजर राहिल्यानंतर राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिला सल्ला; म्हणाले, वसंत तु…