Share

चिमुकल्याच्या टॅलेंटवर आनंद महिंद्रा झाले फिदा, मासेमारीसाठी केलेला जुगाड पाहून केलं कौतुक, पाहा VIDEO

सोशल मीडियावर आपण देसी जुगाडाचे अनेक व्हिडीओ पाहात असतो. अगदी टाकाऊ वस्तूंपासून लोकांनी गाड्या देखील बनवलेल्या आहेत. गाड्या बनवणारे हे अतिशय सामान्य कुटुंबातील लोक आहेत. त्यांच्या या जुगाडावर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक, उद्योगपती आनंद महिंद्रा देखील फिदा असतात.

आनंद महिंद्रा अशा लोकांना नेहमी मदत करतात. बनवलेल्या जुगाड गाड्यांच्या व्हिडीओला ,फोटोला सोशल मीडियावर टाकून कौतुक करतात. सध्या अशाच एका लहान मुलाचा मासे पकडतानाचा व्हिडीओ पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सोबतच तो व्हिडीओ त्यांनी ट्विट करत लहान मुलाचं कौतुक केलं आहे.

आनंद महिंद्रा यांनी मुलाच्या मासेमारीचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुलगा देसी जुगाड करत मासेमारी करताना दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, कोणताही तपशील न घेता हा व्हिडिओ त्यांच्या इनबॉक्समध्ये सापडला आहे.

तसेच, आनंद महिंद्रा पुढे म्हणाले की, अशा व्हिडीओमुळे या गोंधळलेल्या जगात मोठ्या शांततेची भावना निर्माण होते. त्यांनी लिहिले, ‘निश्चय + साधेपणा + संयम = यश’ असे त्यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे. त्यांनी आश्चर्य व्यक्त करत मुलाचे कौतुक केलं आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक लहान मुलगा लाकडी स्ट्रक्चर घेऊन आला आहे. ती वस्तू तो नदीच्या काठावर जेवढी शक्य तेवढी जमिनीत रुतवतो. यासाठी तो हातोड्याचा वापर करतो. यानंतर तो त्यातील दोरखंडात भाताचे गोळे चिकटवतो आणि दोरखंड पाण्यात फेकून देतो.

जेव्हा त्याला मासे अडकल्याचे जाणवते तेव्हा मुलगा काही क्षण बसून राहतो. यानंतर तो लाकडावर चाक फिरवू लागतो आणि दोरा ओढतो. दोरखंडात दोन मोठे मासे अडकल्याचे आपल्याला दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांनी पाहिले आहे.जवळपास 70 हजार लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. सर्वजण त्या मुलाचे कौतुक करत आहेत.

इतर

Join WhatsApp

Join Now