Share

महिंद्रा शोरूममध्ये अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचा अपमान केल्याने भडकले आनंद महिंद्रा, ट्विट करत म्हणाले…

महिंद्राच्या शोरूममध्ये एका शेतकऱ्यासोबत शोरूम सेल्समनने गैरवर्तवणुक केली आहे. या संदर्भातील व्हिडिओ देखील सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यावर आता महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. सेल्समन विरोधात संताप व्यक्त केला आहे.

कर्नाटकातील एका शोरूममध्ये शेतकरी बोलेरो पिकअप खरेदी करण्यासाठी गेला होता. महिंद्राचा सेल्समन या शेतकऱ्याकडे पाहून, त्याच्या कपड्यांकडे पाहून उद्धट भाषेत बोलला. त्याला त्याने हिनपणाची वागणूक दिली. त्याचा अपमान केला. एवढेच काय तर, शेतकऱ्याला शोरूम मधून बाहेर जाण्यास सांगितले,आणि त्याची लायकी दाखवली.

शेतकऱ्याने यावर प्रतिउत्तर देत, रोख रक्कम सेल्समन पुढे मांडत लगेचच गाडीची मागणी केली. मात्र,सेल्समन शेतकऱ्याला लगेचच गाडी डिलिव्हरी देऊ शकला नाही. शोरूम सेल्समनला शेतकऱ्याने चांगलाच इंगा दाखवला.यावर, सेल्समनने त्याला आम्ही तुम्हांला गाडी चार दिवसांत पोहच करू सांगितले आणि माफी मागितली.

मात्र, शोरूम मधील सेल्समनने शेतकऱ्यांची लायकी काढल्याने त्याला प्रचंड राग आला होता. सेल्समन शेकऱ्याला विनवणी करू लागला आणि माफी मागू लागला. मात्र ,आपली लायकी काढल्याने शेतकऱ्याने सेल्समनचे म्हणणे ऐकले नाही. यानंतर,शेतकरी शोरूम मधून कार घ्यायचीच नाही असे सांगून तडकाफडकी निघून गेला.

कर्नाटकातील तुमकूर येथील घटनेचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये शेतकऱ्याने असा दावा केला होता की जेव्हा तो “10 लाख रुपये” किंमतीचा बोलेरो पिकअप घेण्यासाठी गेला होता, तेव्हा एका सेल्स कर्मचाऱ्याने त्याची खिल्ली उडवली आणि म्हणाला की, खिशात 10 रुपये सुद्धा नसतील आणि गाडी घेण्यासाठी आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाबद्दल महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना समजताच त्यांनी नाराजी व्यक्त करत कठोर कारवाईचे संकेत दिले. म्हणाले,” महिंद्रा राइजमध्ये आम्ही आपल्या सर्व समुदायाला आणि सर्व हिधारकांच्या हिताचा आणि उद्धाराचा विचार करण्याची मूल्य जपतो.तसेच व्यक्तीचा मान सन्मान कायम राखला जावा हे दुसरं मुख्य मूल्य आम्ही जपतो. याच संदर्भात कोणत्याही पद्धतीची गडबड झाली तर त्या प्रकरणाकडे तातडीने आणि गांभीर्याने लक्ष दिलं जाईल.”

कंपनीने उचललेल्या पावलांची माहिती देताना, विजय नाकरा, सीईओ, ऑटोमोटिव्ह डिव्हिजन, M&M लिमिटेड यांनी ट्विट केले, “डीलर्स हे ग्राहक केंद्रित अनुभव देण्यासाठी पुरवठा साखळीमधील अविभाज्य भाग आहे आणि आम्ही आमच्या सर्व ग्राहकांचा सन्मान करतो. तसेच थेट ग्राहकांशी सबंध असणाऱ्या कर्मचार्‍यांना गरज पडल्यास प्रशिक्षण देखील दिले जाईल. कोणतेही उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई करा,”

इतर

Join WhatsApp

Join Now