शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा काल ६३ वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात मातोश्रीवर साजरा झाला. वेगवेगळ्या भागातून मातोश्रीवर आलेल्या असंख्य शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. या दरम्यान आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे मातोश्रीवर दाखल झाले. (Anand Dighe’s nephew along with Thackeray to fight the difficult situation)
उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी मातोश्रीवर आलेले केदार दिघे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी, उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. आणि आपण कायम सोबत असल्याचे पुन्हा एकदा सांगितले.
वेळोवेळी उद्धव ठाकरेंच्या समर्थनात बोलणारे केदार दिघे हे पुन्हा एकदा शिवसेनेत सक्रिय झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला ठाण्यातून आव्हान उभे राहिल्यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी झाली होती. मात्र आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी उद्धव ठाकरेंचे कायम समर्थन केले. आणि जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्या पक्षविरोधातील भूमिकेवर टीका केली आहे.
‘त्या ४० जणांनी स्वतःच्या पक्षप्रमुखाला सत्ताधीश दिल्लीश्वरासमोर झुकण्यास सांगितले. पण आपण झुकला नाहीत. या कठीण परिस्थितीतही सामान्य शिवसैनिकांना आपण बळ दिलेत महाराष्ट्र बाणा…हाच तो ठाकरे बाणा!,’ अशा शब्दात केदार दिघेंनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याच प्रसंगी केदार दिघे यांचे मोठ्या उत्साहात मातोश्रीवर असंख्य शिवसैनिकांनी स्वागत केले. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या जन्मदिनी मातोश्रीवर केदार दिघेंची मोठी हवा झाली. यावेळी केदार दिघेंनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर गटावर निशाणा साधला.’भाजपसोबत युती करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनतील, अशी ऑफर शिवसेनेला देण्यात आली होती.’
‘ त्यासाठी बंडखोर आग्रही होते. ही बातमी काही माध्यमांनी चालवली. त्यात जर तथ्य असेल तर एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या शिकवणीवर बोलू नये. दिघे साहेबांनी उभे आयुष्य शिवसेनेसाठी त्यागले. दिघे साहेबांचा आधार घेऊन आपल्या भूमिका मांडणं थांबवावं,’ अशा खरमरीत शब्दात केदार दिघेंनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
खासदार प्रतापराव जाधव यांना मोठा धक्का; शिंदे गटात गेल्याने सख्या भावानेच सोडली साथ
४५ कोटी रोकड, ७ किलो सोने; अर्पिताच्या घरी सापडला २ हजार व पाचशेच्या नोटांचा ‘डोंगर’
आमदार भावाने गद्दारी केल्याने बहीण संतापली; भाऊ शिंदेंसोबत जाताच ठाकरेंसाठी बहीण मैदानात