शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारणच पालटले. महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे गटाने भाजपसोबत मिळून नवीन सरकार स्थापन केले. सध्या शिवसेना कोणाची याचा लढा दोन्ही गटांकडून न्यायालयात सुरू आहे. असली नकलीच्या दाव्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगासमोर संघर्ष सुरू आहे.
जसा न्यायालयात संघर्ष सुरू आहे तसा स्थानिक पातळीवरही या दोन गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. अनेकवेळा दोन्ही गटांमध्ये वाद झालेले पहायला मिळाले आहेत. अनेक कार्यालयांवर दोन्ही गटांनी आपआपला दावा ठोकला आहे जे आधी शिवसेनेचे कार्यालये होती.
आता शहरातील शिंदे सेनेचे मुख्यालय असलेले आनंद आश्रम याचे नाव बदलण्यात आले आहे. आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त हा निर्णय घेण्यात आला आणि या आश्रमाचे नाव बदलण्यात आले. उद्धव ठाकरे गुरूवारी ठाणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला वंदन करून हार घातला.
त्यांनी जैन समाजाच्या कार्यक्रमालाही उपस्थिती दर्शवली आणि ते आरोग्य शिबीरातही गेले होते. पण ते धर्मवीर आनंद दिघेंच्या आश्रमात गेले नाहीत. त्यांची गाडी आश्रमासमोरून गेली पण त्यांनी गाडी थांबवली नाही. आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त या आश्रमाचे नाव बदलून बाळासाहेबांची शिवसेना आनंद आश्रम असे ठेवण्यात आले आहे.
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं कार्यालय या ठिकाणी असून येथूनही शिंदे गटाचं कामकाज पाहिलं जातं. ठाणे किंवा इतर ठिकाणांवरून अनेक लोकं आपल्या समस्या मांडण्यासाठी येथे येत असतात. दरम्यान, मुंबई मंत्रालयासमोरही शिंदे गटाचे कार्यालय उघडण्यात आले आहे त्यामुळे तेथेही अनेकजण समस्या घेऊन येत असतात.
आनंद आश्रम याला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. याच आनंद आश्रमामध्ये आनंद दिघेंनी शिवसेना मोठी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेले एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. शिंदे समर्थकांनी जून महिन्यात या आश्रमाचा ताबा घेतला होता. त्यावेळी ठाकरे समर्थकांकडून कोणताही विरोध करण्यात आला नव्हता.
महत्वाच्या बातम्या
रिक्षाचालकाने घराचं, मुलाचं अन् टेम्पोचं नाव ठेवलं संविधान, कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
केएल राहुलच्या देशभक्तीला सलाम! लग्नानंतर देशासाठी ‘या’ खास कारणामुळे रद्द केले हनिमून
बहीण अथियाच्या पाया पडताना दिसला अहान शेट्टी; भावा बहिणीचे प्रेम पाहून डोळे भरून येतील
राष्ट्रवादीला झटका, शरद पवारांचा निकटवर्तीय आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? चर्चांना उधाण






