७० व्या वर्षी एका वृद्ध महिलेने तिच्या नातीच्या उपचारासाठी ४० हजार रुपये १० टक्के व्याजदराने व्याजाने घेतले होते. बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने, त्या वृद्ध महिलेकडून तब्बल ८ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील सारसबाग येथून समोर आला आहे.(An old woman was begging in front of Saraswati in Pune)
दिलीप विजय वाघमारे, असे त्या महानगरपालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दिलीप वाघमारे हा पुणे महानगरपालिकेच्या झाडू खात्यात कामाला आहे. जेष्ठ महिलेला मिळालेल्या निवृत्ती वेतनातून त्याने हे पैसे उकळले आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षाच्या या वृद्ध महिलेला एक नात आहे. महिलेने नातीच्या उपचारासाठी ५ वर्षापूर्वी दिलीप वाघमारे, यांच्याकडून १० टक्के व्याजदराने ४० हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात वृद्ध महिलेने कर्ज काढून ४० हजार मुद्दल आणि व्याजापोटी १ लाख रुपये दिले होते.
मात्र वाघमारे याने वृद्ध महिलेच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन आणखी व्याज आहे असे महिलेला सांगितले. ते व्याज वसूल करण्यासाठी महिलेचे दोन एटीएम कार्ड व पासबुक वाघमारे याने काढून घेतले. त्या एटीएमवर दरमहा जमा होणारे १६ हजार ३४४ रुपये वाघमारे काढून घेत होता, तर महिलेला खर्चासाठी दरमहा १ ते २ हजार रुपये देत होता. गेल्या पाच वर्षांपासून हे सुरू होते.
वाघमारे हा महिलेला खर्चासाठी पुरसे पैसे देत नसल्यामुळे महिलेवर भीक मागण्याची वेळ आली. वाघमारे पुरेसे पैसे देत नव्हता, त्यामुळे वृद्ध महिलेवर उपासमारीची वेळ आली होती. तसेच महिलेला वैद्यकीय खर्चासाठीही पैसे पुरत नव्हते.
त्यामुळे ७० वर्षीय वृद्ध महिलेने पुण्यातील सारस बागेसमोर भीक मागण्यास सुरुवात केली. ती सारसबाग गणपतीसमोर फुटपाथवर भीक मागून जगत होती. गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तिच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी महिलेने सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यानंतर नागरिकांनी खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी भैरट यांना भेटून महिलेची व्यथा सांगितली.
त्यानंतर दिलीप वाघमारे याला अटक केली आहे. वाघमारे याच्या घराची झडती घेतली असता, घरामध्ये पेन्शनधारकांचे ८ एटीएम कार्ड व ५ पासबुक सापडले आहेत. वाघमारे यानी आणखी कोणाला त्रास देऊ नये, म्हणून आणखी कोणाकडून बेकायदेशीरपणे व्याजाची रक्कम वसुल केली असल्यास, त्याबाबत खडक पोलीसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
घर मालकीणीने अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे, 30 वर्षीय तरुणाने महिलेची केली निर्घृण हत्या
जॉन्सनच्या बेबी पावडरवर जगभरात येऊ शकते बंदी; यामागील कारण ऐकून बसेल धक्का…