महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना धुळे येथे घडली आहे. 14 मार्चपासून मुलीच्या न्याय हक्कासाठी सुधन्वा भदाणे आणि त्यांच्या पत्नी रंजना भदाणे हे दोघे आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र 14 दिवस उलटून देखील प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही.
धक्कादायक बाब म्हणजे अखेर आंदोलन करणाऱ्या वृद्धाचा प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या वृद्धाचं वय 70 वर्षे असून त्यांच्या पत्नी पासष्टी पार आहेत. तर पत्नी रंजना भदाणे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सया घटनेने पुन्हा महाराष्ट्र हादरला आहे.
तसेच याबाबत बोलताना नातेवाइकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. या तीन दिवसांमध्ये प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या वृद्ध दांपत्याची साधी विचारणा करण्यासाठीदेखील फिरकला नसल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनावर देखील सर्व स्तरातून टीका होतं आहे.
तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय.. 14 दिवसांपासून धुळ्यातील दुसाणे इथले रहिवासी असलेले सुधन्वा भदाणे आणि रंजना भदाणे हे आपल्या मुलीच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसले होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भदाणे यांच्या मुलीचा रावसाहेब महाले यांच्याशी विवाह झाला होता.
मात्र पतीने घटस्फोट न देता परस्पर विवाह केला. गेल्या 16 वर्षांपासून भदाणे यांच्या मुलीला तिच्या पतीने टाकून दिले आहे. याच कारणामुळे भदाणे दांपत्य गेल्या 14 तारखेपासून उपोषणास बसले होते. मुलीच्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी भदाणे दांपत्य आमरण उपोषणास बसले होते.
दरम्यान, अखेर सुधन्वा भदाणे यांची आंदोलना दरम्यान प्रकृती खालावली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर रंजना भदाणे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपोषण आंदोलनाची प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
१०० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाले, तरी ब्लेडचे डिझाइन आजही तसेच का आहे माहितीये का?
तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत वाद, मुनगंटीवार आणि अजितदादा भिडले
लहान मुलांच्या झोक्यावर खेळण्याची मस्ती तरुणांना पडली महागात; व्हिडिओ पाहाल तर हसून-हसून लोटपोट व्हाल
‘मला मंत्री केलं असतं तर..’ दोन दिवस नॉटरिचेबल असलेल्या आमदाराने बोलून दाखवली मनातली खंत