Share

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी गावातच उभारली जाणार आयटी कंपनी; महाराष्ट्रात प्रथमच आगळावेगळा प्रयोग

आयटी कंपनीत काम करण्याचे स्वप्न बघणाऱ्या मुलांसाठी एका तरुणाने अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात थेट आयटी कंपनी उभारून कित्येक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागात आयटी कंपनी उभारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात प्रथमच होताना दिसत आहे.

या कंपनीमुळे अनेक शेतकरी मुलांचे आयटी कंपनीत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द गावातील ३७ वर्षीय रावसाहेब घुगे नामक तरुण गावात आयटी कंपनी उभारण्याची तयारी करत आहे. यासाठी त्याने गावातच खडकाळ माळरानावरची जागा निवडली आहे.

गावातील कित्येक मुलांना आयटी कंपनीत काम करण्यात येत नाही. ग्रामीण भागातील मुलांना आयटी क्षेत्राचा प्रवास करताना अनेक अडचणींना सामोर जावे लागते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करत रावसाहेब घुगेने आयटी कंपनी गावात उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या कंपनीचे काम प्रगतीपथावर येऊन पोहचले आहे.

रावसाहेब उभी करत असलेल्या कंपनीचे नाव बिझनेस अॅप्लिकेशन अँड प्लॅटफॉर्म्स असे आहे. या कंपनीत शेतकऱ्यांच्या मुलाला योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी देण्यात येणार आहे. सध्या या कंपनीशी अकोले, संगमनेर आणि सिन्नर या तालुक्यातून 45 शेतकऱ्यांची मुले जोडली गेली आहेत. या मुलांना देखील आपण आयटीत काम करणार असल्याने सर्वांत जास्त आनंद झाला आहे.

मुख्य म्हणजे रावसाहेब यांची अमेरिकेत स्वताची कंपनी आहे. या कंपनीतील काम सांभाळत ते गावात आयटी कंपनी उभारत आहेत. आपण स्वतः एक विदेशी कंपनी चालवत असून सुध्दा आपल्याला गावातील मुलांसाठी काही करता आले नाही अशी खंत रावसाहेब यांना वाटत होती. याकारणानेच त्यांनी कंपनी उभी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता लवकरच या कंपनीचे काम पूर्ण होणार आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना याठिकाणी शिकता येणार आहे. दरम्यान आयटी क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी कित्येक मुलांना बाहेर जाता येत नाही. तसेच गावातील लोकांच्या मानसिकतेमुळेही त्यांच्या शिक्षणात अनेक अडचणी येतात. मात्र आता गावातच कंपनी सुरु झाल्यानंतर अशा सर्व तक्रारी दुर होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या
विकेट पडली हार्दिकची अन् नजरा खिळल्या पत्नी नताशावर, क्रिकेटच्या मैदानातील तो Video झाला व्हायरल
“रोहित शर्मा… जा वडापाव खाऊन ये” सोशल मीडियावर मीम्सचा धुराळा, चाहते का संतापले?
ऑस्कर विजेत्या coda ने चोरली बॉलिवूड चित्रपटाची कथा? सलमान खानने केली होती ‘त्या’ चित्रपटात भूमिका
मोदींनी ‘सब का साथ, सब का..’ हा संदेश दिला, पण राज्य चुकीच्या दिशेने चाललंय’ भाजप नेत्याचे गंभीर आरोप

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now