Share

Yakub Memon : याकूबच्या थडग्यावरील सजावटीमागे कोणाचा हात? स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्याने केला मोठा खुलासा

Yakub Memon

Yakub Memon : मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यात याकुब मेमनच्या कबरीला मार्बल आणि दिव्यांनी सजवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. हा फोटो समोर येताच त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. याकुबच्या कबरीवर दिवा लावण्यावरून भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे

या प्रकरणावरून भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकुब मेमनच्या थडग्याचे रूपांतर समाधीमध्ये झाल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांनी मुंबईकरांची माफी मागावी, असेही राम कदम यांनी म्हटले आहे.

याकूब मेमनला पाच वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली होती. त्याचा मृतदेह मरीन लाइन्स रेल्वे स्थानकासमोर सुमारे ७ एकर जागेत बांधलेल्या मोठ्या स्मशानभूमीत दफन करण्यात आला होता. त्यानंतर आता याकुब मेमनच्या कबरीचा एक फोटो समोर आला आहे. यात याकुब मेमनच्या कबरीला मार्बल आणि लाईट्सने सजवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

बडा स्मशानभूमीचे कर्मचारी अशफाक यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, स्मशानभूमीत अशा अनेक कबरी आहेत ज्या मार्बलने सजवलेल्या आहेत, त्यासाठी ते वार्षिक शुल्क भरत असतात.

पुढे कर्मचाऱ्याने सांगितले की, याकुब मेमनच्या कबरीची जागा फार पूर्वीपासून घेण्यात आली आहे. याकुब मेमनच्या कबरीजवळ त्याच्या नातेवाईकांच्या आणखी तीन कबरी आहेत. त्या ठिकाणी सर्वत्र दिवा लावला आहे. त्याने सांगितले की, संपूर्ण कब्रस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिवे लावण्यात आले आहेत. हे दिवे संध्याकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत सुरु असतात. त्यांनतर ते विझवले जातात.

अशफाकने सांगितले की, याकुब मेमनचे अनेक नातेवाईक येऊन कबरीच्या स्वच्छतेची काळजी घेतात. तसेच त्याने मारबलने वेढलेल्या अशा अनेक कबरी दाखवल्या. यावेळी तो म्हणाला की, शब-ए-बरातच्या दिवशी संपूर्ण कब्रस्तान सजवले जाते, दिवे लावले जातात. कदाचित हा फोटो त्यावेळचा असावा.

महत्वाच्या बातम्या
Bareilly : एकाच महिला पोलिसावर फिदा झाले दोन पोलिस कर्मचारी, पोलिस स्टेशनमध्येच झाला गोळीबार
Ulhas Bapat : ..त्यामुळे एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद येऊ शकते धोक्यात, घटनातज्ञ उल्हास बापटांचे स्पष्टीकरण
Jitendr avhad : राष्ट्रवादीच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षाने पक्ष सोडला; आव्हाडांसह ‘या’ नेत्यांवर केले गंभीर आरोप
…म्हणून शिंदे गटानं केली धनुष्यबाण चिन्हं गोठवण्याची मागणी; ‘हे’ आहे खरं कारण

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now