गुजरातमधील जामनगर येथील रहिवासी असलेले ३४ वर्षीय महेश भुत (Mahesh Bhut) लहानपणापासूनच वडिलांना शेतीत मदत करायचे. वडिलांसोबत काम करताना त्यांनी नेहमी शेतीतील अडचणी कमी करण्याचा विचार केला. सन २०१४ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जेव्हा ते पूर्णपणे शेतीमध्ये गुंतला तेव्हा त्याने कीटकनाशके आणि खतांचा खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला.(Mahesh Bhut, Organic Farming, E-Tractor, Petrol-Diesel)
तसेच ट्रॅक्टरची सर्विसिंग आणि पेट्रोल-डिझेलवर मोठा खर्च होत असल्याचे पाहून त्यांनी स्वतः ई-ट्रॅक्टर बनवला. त्यांचा ‘व्योम’ नावाचा ट्रॅक्टर सध्या खूप चर्चेत आहे. महेश भाईंना आतापर्यंत देशभरातून सुमारे २१ ई-ट्रॅक्टर्सच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की महेश भाई ना इंजिनियर आहेत ना ते मोठ्या शहरात राहतात. गावात राहून सुमारे पाच लाख रुपये खर्चून त्यांनी हा ई-ट्रॅक्टर बनवला.
वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणतात, माझे वडील सुशिक्षित शेतकरी होते. त्यामुळेच वर्षअखेरीस शेतीतील गुंतवणूक आणि त्याचे फायदे याबद्दल ते नेहमी अंदाज बांधत असायचे. मी त्यांच्याकडून शेती करायला शिकलो आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी खर्च कसा कमी करायचा हेही त्यांच्याकडून शिकलो. वास्तविक, ई-ट्रॅक्टर बनवण्याचा विचार त्यांच्या मनात नेहमीच होता आणि त्यासाठी ते कामही करत होते.
अनेक प्रयोग करूनही समाधान न मिळाल्याने त्यांनी उत्तर प्रदेशातून ई-रिक्षा बनवण्याचे प्रशिक्षण घेण्याचा विचार केला. ते शाहजहांपूर (उत्तर प्रदेश) येथून ई-रिक्षा बनवायला शिकले. मात्र, त्यामागे त्यांचा ई-ट्रॅक्टर बनवण्याचा हेतू होता. २०२१ मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ई-ट्रॅक्टर्स अधिक जोमाने बनविण्यावर भर दिला. हा ट्रॅक्टर त्यांनी नव्या पद्धतीने बनवण्यास सुरुवात केली. ट्रॅक्टरच्या बॅटरीपासून ते बॉडीपर्यंत सर्व काही त्यांनी स्वत: बनवले आहे.
तब्बल सात महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर आणि अनेक प्रयत्नांनंतर अखेर त्यांना यश मिळाले. गेल्या चार महिन्यांपासून ते त्यांच्या शेतात या ई-ट्रॅक्टरचा वापर करत आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावावरून ट्रॅक्टरचे नाव ‘व्योम’ ठेवले. महेश भाई यांचा दावा आहे की त्यांनी बनवलेला ट्रॅक्टर एका चार्जवर पूर्ण १० तास आरामात चालेल. ते म्हणतात की, हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर २२ एचपी पॉवर काढतो, जी ७२ वॅट लिथियम बॅटरीद्वारे चालविली जाते. ही उत्तम दर्जाची बॅटरी आहे, ज्याला वारंवार बदलण्याची आवश्यकता नाही. या ट्रॅक्टरला पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात, त्यानंतर तो १० तास टिकू शकतो.
याशिवाय, त्यांनी हा ट्रॅक्टर एका अॅपला जोडला आहे, ज्यावरून तुम्हाला ट्रॅक्टरची सर्व माहिती मिळेल. बॅटरी किती चार्जे आहे? कोणती वायर चुकीची आहे? ही सर्व माहिती तुम्हाला अॅपवरूनच मिळेल. महेश सांगतात, जेव्हा ट्रॅक्टर खराब होईल, तेव्हा तुम्हाला अॅपवरून कळेल की दोष कुठे आहे? त्यामुळे त्याची दुरुस्ती करणे सोपे जाते. याशिवाय मी त्यात रिव्हर्स गियरही दिला आहे, जेणेकरून ट्रॅक्टर कुठेतरी अडकला तर ते बाहेर पडणे सोपे जाईल.
महेश यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची रचना केली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना फारसा त्रास होऊ नये. फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, पूर्वी एक तासासाठी डिझेल ट्रॅक्टर चालवण्याचा खर्च सुमारे १२५ रुपये असायचा, तर इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर केवळ १५ रुपये प्रति तास चालतो. हा खरेदी करताना तुम्हाला सुरुवातीला थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतील. बाजारात साधारण ट्रॅक्टर तीन लाखात मिळतात, तर व्योम ट्रॅक्टरची किंमत महेश भाईंनी पाच लाख ठेवली आहे.
तसेच महेश भाई सांगतात की सरकारने ई-ट्रॅक्टरमध्ये सबसिडी दिली तर त्याची किंमत आणखी खाली येऊ शकते. महेश भाईंनी बनवलेला ई-ट्रॅक्टर पाहण्यासाठी सध्या अनेक लोक त्यांच्या शेतात येत असतात. त्यांना देशभरातून २१ हून अधिक व्योम ट्रॅक्टरच्या ऑर्डरही मिळाल्या आहेत आणि महेश त्यांच्या उत्पादनात गुंतले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
शेतकऱ्याचा नाद नाय! बुलेटपासून फक्त एवढ्या रुपयांत बनवला ट्रॅक्टर, आता १४० शेतकऱ्यांनी केला खरेदी
शेतकऱ्यांनो! आता वीज तोडली तरी घाबरायचं नाय, पठ्ठ्याने आणलाय भन्नाट जुगाड, ट्रॅक्टरपासून होतेय वीजनिर्मिती रशियन सैनिकांवर नामुष्की! सैनिकांना रोखण्यासाठी युक्रेनचे लोक रस्त्यावर, शेतकऱ्याने ट्रॅक्टरने ओढत नेला टॅंक
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारच्या या योजनेमुळे आता ट्रॅक्टर घ्यायचे स्वप्न होणार पूर्ण, जाणून घ्या.