अपघात(Accident): अलीकडे अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. दर दिवसाला अपघात होत आहे. या मागची अनेक कारणे आहेत. अपघाती मृत्यूचे प्रमाणही खूप वाढलेले दिसून येत आहे. अपघात म्हटलं की सर्वांना धक्काच बसतो. अशीच धक्कादायक घटना बीड-परळी महामार्गावर घडली आहे. सकाळी १०.३० च्या दरम्यान सिरसाळा परिसरात दोन कारचा भीषण अपघात झाला आहे.
महिला पोलीस कर्मचारी आपल्या ९ वर्षीय मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होत्या. हॉस्पिटलमध्ये जात असतानाच हा अपघात घडला. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर सोबतचे दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात दोन कार मध्ये झाला. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही कार खड्ड्यात ऐकमेकांवर पडलेल्या अवस्थेत आढळल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला पोलीस कर्मचारी बीडच्या दिंद्रूड येथील असून त्यांचे नाव कोमल शिंदे आहे. मुलाचे नाव यश आहे. गाडीचालक पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे आणि डॉ. इलियास हे गंभीर जखमी झाले आहेत. दिंद्रूड येथील पोलीस कर्मचारी कोमल शिंदे या आपल्या आजारी मुलाला उपचारासाठी एम एच १४, जी वाय ९११३ कारमध्ये घेऊन जात होत्या.
कार पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे चालवत होते. अशातच परळीहून एम एच ४७, ० ५३२६ या नंबरची कार समोरून येत होती. दोन्ही कारची सिरसाळा जवळ समोरासमोर धडक झाली. यात पोलीस कर्मचारी शिंदे आणि त्यांचा मुलगा यश याचा जागीच मृत्यू झाला. तर चालक लटपटे आणि दुसऱ्या कारमधील एकजण गंभीर जखमी झाले आहेत.
दुसऱ्या कारमधील जखमी व्यक्ती वैद्यकीय अधिकारी डाॅ. इलियास असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना तात्काळ सिरसाळा पोलीसांनी आणि नागरिकांनी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले आहे. मागील काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूनंतर याबाबत उपाययोजना करण्याचं सरकारने ठरवलं होत.
अजूनपर्यंत अपघाताची संख्या कमी झालेली दिसत नाही. आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला. गणेशभक्त मुंबईहून सावंतवाडीला जात असताना हा अपघात झाला. अपघातामध्ये २ जागीच ठार तर ३ जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
Ramdev Baba: एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे गौरव पुरूष, तेच बाळासाहेबांचे खरे वारसदार; रामदेवबाबांची स्तुतीसुमने
Amit Shah : तुमच्या मुलाऐवजी बिगर भाजप नेत्याने ‘ते’ कृत्य केले असते तर…; अभिनेत्याचा अमित शहांना सवाल
Shubhaman Gill: सारा तेंडुलकरला नाही तर सारा अली खानला डेट करतोय शुभमन गिल; थेट पुरावेच आले समोर
‘उद्धव ठाकरेंना सांगोल्यात बंगला भाड्याने घेऊन देतो, फक्त..’, शहाजीबापूंनी दिलं ओपेन चॅलेंज