हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेले व्यक्तिमत्व. तसेच ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे व्यक्ती म्हणजे धर्मवीर. दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास सांगणारा “धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे” हा चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
१३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट खुप धूमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केला आहे. आनंद दिघे यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेदेखील प्रसाद ओकचे आणि धर्मवीर चित्रपटाचे कौतुक केले आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट करत अमृताने प्रसाद ओकसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. सोबत लिहिले आहे की, ‘भेटला विठ्ठल …… प्रिय प्रसाद. गेल्या काही महिन्यांची गडबड धावपळ तुला माहितीच आहे तेव्हा ”धर्मवीर” बघायला उशीर झाला त्या साठी sorryपण कलाकृती अजरामर असेल तर ती कधी हि पहिली तरीही ती तितकीच प्रभावी असते.’
दरम्यान, यापूर्वी देखील अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी हिने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली होती, या पोस्टमध्ये अभिनेता प्रसाद ओकचे कौतुक केले होते. या पोस्टमध्ये धर्मवीर आनंद दिघेंचा पोस्टर शेअर करत हेमांगी म्हणाली की, “दादर हुन येताना माहीमच्या signal वरून western express highway साठी right मारला आणि डावीकडे हे डोळे दिपवणारं एका मराठी चित्रपटाचं भलं मोठ्ठं पोस्टर पाहिलं आणि खरं सांगू अंगात एक चेतना निर्माण झाली.”
हेमांगी पुढे म्हणाली, “Slow motion मध्ये चालत आलेला एक चेहरा पाहिला! आणि मनात आलं कसं? हे कसं शक्य आहे. ते परत आले की काय! मला अक्षरशः काही मिनिटं लागली भानावर यायला! इतकं साम्य? Hats off त्या make up artist आणि look designer ला. बरं जो कलाकार या महान व्यक्तीची भूमिका साकारणार आहे त्याबद्दल तर जितकं बोलू तितकं कमी पडेल!”