Share

अहो आश्चर्यम! देवेंद्र फडणवीस ३५ पुरणपोळ्या पातेलभर तुपासोबत सहज खाऊ शकतात

Amruta Fadnavis

झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) हा शो अल्पावधीतच चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या शोमध्ये दर आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावत आपले कुकिंग कौशल्य दाखवत असतात. यामध्ये प्रशांत दामले परिक्षक म्हणून काम पाहत आहेत. तर संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. तर या आठवड्यात शोमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर (Smita Jaykar), प्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर (Swapnil Bandodkar) आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) पाहुणे म्हणून पोहोचले.

यावेळी कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी पती देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या अनेक आठवणी सांगितल्या. यावेळी सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने अमृता फडणवीस यांना विचारले की, ‘देवेंद्रजी एका बैठकीत किती पुरणपोळ्या खाऊ शकतात?’ यावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी सांगितले की, ‘ते पातेल्याभर तुपासोबत ३० ते ३५ पुरणपोळ्या सहज खाऊ शकतात’.

अमृता फडणवीस यांच्या या उत्तराने सर्वांनाच आश्यर्यचकित केले. त्यांच्या या उत्तराची सध्या माध्यमात फारच चर्चा आहे. त्यानंतर संकर्षणने त्यांना पुढचा प्रश्न विचारला की, ‘लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती?’ यावर त्यांनी म्हटले की, ‘देवेंद्र यांना ३० ते ३५ पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, ते सुद्धा मी न बनवलेल्या’, असे मिश्किल उत्तर अमृता यांनी यावेळी दिले.

दरम्यान, कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हेसुद्धा व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी झाले. यावेळी प्रशांत दामले यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला. त्यांनी म्हटले की, ‘तुम्हाला तुमच्या आईचा हातचा कोणता पदार्थ आवडतो आणि अमृताताईंच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो? मुळात आवडतो की नाही?’

यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ‘प्रशांतजी असे प्रश्न कधीच विचारू नये. कोणी विचारलंच तर लक्षात ठेवावं की, आईला म्हटलं की, तुझ्यापेक्षा पत्नीचा एखादा पदार्थ जास्त आवडतो तर आईला कधीच राग येत नाही. पण दुसरीकडे याच्या उलट केलं तर मात्र जगणं मुश्किल होऊ शकतं. त्यामुळे असे प्रश्न विचारत जाऊ नका’. देवेंद्र फडणवीसांच्या या उत्तराने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्या.

दरम्यान, अमृता फडणवीस या नेहमी काही ना काही कारणाने माध्यमात चर्चेत असतात. यामध्ये कधी त्यांच्या गाण्यांमुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी वेगवेगळ्या राजकीय मुद्यांवर करण्यात येणाऱ्या रोखठोक मतांमुळे त्या चर्चेत येत असतात.

महत्त्वाच्या बातम्या :
चारु शर्मा यांच्या ‘त्या’ चुकीमुळे मुंबई इंडियन्सला मोठा फटका; गमावला भारताचा जबरदस्त गोलंदाज
भारतातील आयुर्वेदिक उपचाराने या देशाच्या माजी पंतप्रधानांच्या मुलीची दृष्टी आली परत; कौतूक करत म्हणाले..
‘या’ प्रॉडक्टला आहे प्रचंड मागणी, तुम्ही घरी बसून कमावू शकता लाखो रुपये, अशी करा सुरूवात

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now