राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांचे नृत्याचे व्हिडीओ तर कधी कोणावर केलेला पलटवार कारणं काहीही असले तरी त्या सतत चर्चेचा विषय बनता.
गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचे ‘मैंने मूड बना लिया हैं’ या नावाने एक गाणे प्रदर्शित झाले. हे गाणे पंजाबी असून त्यांनी स्वतः गायन आणि नृत्य केलेलं आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या बघायला मिळाल्या होत्या.
अशातच त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतांना दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सोशल मीडिया स्टार रियाज सोबत त्यांच्याच गाण्यावर ‘मैंने मूड बना लिया हैं’ यावर नृत्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच या गाण्याची चर्चा रंगली होती.
अमृता फडणवीस यांचे ते पहिले पंजाबी गाणे आहे. या गाण्याचा ट्रेलर जेव्हा आला होता तेव्हाच नेटकऱ्यांनी या गाण्याला जोरदार प्रतिसाद दिला होता.
अमृता यांनी या गण्याबद्दल ट्विट करत माहिती दिली होती. त्यांनी एका ट्विट मध्ये नेटकऱ्यांना या गाण्यावर नृत्य करण्याचे चॅलेंज केले होते. तसेच या चॅलेंजला लोकांनी प्रतिसाद देखील दिला होता.
अमृता फडणवीस यांच्या एका ट्वीटमुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. यासोबतच त्यांनी त्यांचा वेस्टर्न ड्रेसमधला एक फोटोही शेअर केला होता. नुकताच सोशल मिडिया स्टार रियाजसोबत नृत्य करत असतांनाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
कोट्यावधींच्या मालकीन असलेल्या अमृता फडणवीसांच्या डोक्यावर झालय ‘एवढे’ कर्ज; वाचून शाॅक व्हाल
devendra fadanvis : पंकजा मुंडे ठाकरे गटात गटात जाणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्या मातोश्रीवर…
राजकारण संपल्यात जमा होतं पण फडणवीसांना सेटींग लावली अन् नशीबच फळफळलं, थेट केंद्रात मंत्रीपद मिळालं