Share

“आपलं मुंबई शहर उद्ध्वस्त होतंय, आपण आपल्या घरातच मरतोय, याला जबाबदार कोण?”, अमृता फडणवीसांचा सवाल

amruta fadanvis

शनिवारी मुंबईतील ताडदेव येथील भाटीया हॉस्पिटलजवळील २० मजली कमला बिल्डिंगमध्ये भीषण आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी हजर झाल्या. या आगीत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली. मिळालेल्या माहितीनुसार, आगीतून एकूण १९ जणांना वाचवण्यात यश आले होते. (amruta fadanvis critcizes on thackeray gov)

तसेच सुरुवातीला ४ जणांना नायर रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे दोन जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर १५ जणांना भाटीया रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. त्यांना जनरल वॉर्डात ठेवण्यात आले.

याचाच धागा पकडत भाजप नेते व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘आपलं मुंबई शहर आपल्या डोळ्यांसमोर उध्वस्त होत आहे, इमारत बांधताना केलेल्या निष्काळजीपणामुळे आपण आपल्या घरातच मरत आहोत. सरकारी रुग्णालयांनी सुरक्षा नियमांचं पालन न केल्याने आपण रुग्णालयातही मरत आहोत, खड्ड्यांची गर्दी असलेल्या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातातही आपण मरत आहोत. याला जबाबदार कोण?’ असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या. ते म्हणाल्या की, ६ वृद्धांना ऑक्सिजन सपोर्ट सिस्टिमची गरज असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आग आटोक्यात आली असली तरी धुराचे लोट पसरले आहेत.

तसेच गेल्या आठवड्यात ठाण्यातील भिवंडी परिसरात असलेल्या एका गोदामाला भीषण आग लागली होती. या अपघातात तीन जण गंभीररित्या भाजले होते. आग इतकी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.

दरम्यान, आठवडाभरापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना टळली होती. प्रत्यक्षात विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनाला आग लागली. एअर इंडियाच्या विमानाला मागून ढकलणाऱ्या विमानाच्या टगमध्ये आग लागली. अपघात झाला तेव्हा विमानात प्रवासी उपस्थित होते. या विमानातले सुमारे ८५ प्रवासी जामनगरला जाणार होते. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला होता.

महत्त्वाच्या बातम्या
‘राजकीय भूमिका कशाला हवी?’, नाना पटेकरांनी किरण मानेंना फटकारले
मुलीच्या बलात्काराचा फौजी पित्याने असा घेतला बदला, न्यायालय आणि पोलीस बघतच राहिले
तीन अल्पवयीन मुलांनी घेतला तरुणाचा जीव; पोलिसांना म्हणाले, आम्ही पुष्पा बघितला म्हणून…
‘एकाही घराला धक्का लागू देणार नाही, जबरदस्तीने बाहेर काढलंच तर भारत बंद करूयात”

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now