Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. नुकतेच त्यांचे ‘मूड बनालीया’ हे गाणे व्हायरल झाले आहे. खूप कमी वेळात या गाण्याने मिलियन व्हिवर्सचा टप्पा गाठला आहे.
सोशल मीडियावर हे गाणे ‘हिट’ झाले असून बऱ्याच लोकांनी यावर रिल्स बनवल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी देखील मोठ्या हौसेने या गाण्यावर रील बनवले आहे. मात्र याच रीलमुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
रियाज अलीने या सुप्रसिद्ध रील स्टार सोबत अमृता फडणवीस यांनी हा व्हिडिओ बनवला आहे. रियाजने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केलाय, तेव्हापासून अमृता फडणवीस आणि रियाज यांच्या या व्हिडिओची चर्चा सूरु आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे हा व्हिडीओ राहिला बाजूला, त्यातले गाणेही राहिले बाजूला परंतु, नेटकऱ्यांनी यावर वेगळ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वेगळ्याच विषयावर विविध उलट सुलट प्रतिक्रिया या व्हिडीओखाली पहायला मिळत आहेत. यामुळे हा व्हिडीओ वादग्रस्त ठरला आहे.
अमृता फडणवीस व रियाज यांनी ज्या ठिकाणी हा व्हिडीओ बनवला ते उपमुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान दिसत आहे. तसेच राज्यात हिंदुत्वा बद्दल बोलणाऱ्या खुद्द फडणवीसांच्या पत्नीच एका मुस्लिम मुलासोबत डान्स करत आहेत.
ही गोष्ट अनेकांना पटलेली नाही. यामुळे या व्हिडीओवर वादग्रस्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. दरम्यान अनेक लोकांनी व्हिडीओखाली कमेंट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. एवढे होऊनही मूड बनालीया या गाण्याला लोकांनी पसंती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या