Share

amravati : आईची शेवटची इच्छा होती मुलाच्या हातून चहा प्यायचा! पण मुलगा आलाच नाही; आईनं वृद्धाश्रमात सोडला जीव

shakuntalabai palaspagar

amravati shakuntalaai palaspagar women death  असे म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. आई ही आपल्या मुलांची खुप काळजी घेत असते. तिच्या इतके प्रेम मुलावर कोणीच करु शकत नाही. पण अशात काही मुले आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. इतकंच नाही तर काही मुलं हे आईवडिलांना वृद्धाश्रमात देखील सोडतात.

आता असाच एक प्रकार अमरावतीतून समोर आला आहे. आपली आई वृद्ध झाल्यानंतर एका मुलाने आपल्या आईला रस्त्यावर सोडून दिलं. त्यानंतर त्या वृद्धाश्रमात राहत होत्या. मुलाची भेट होईल अशी आस आजीला होती. वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी मुलाशी संपर्क साधला होता. पण त्यांचा संपर्क झाला नाही. अशात मुलाच्या आठवणीत आईचा मृत्यू झाला.

मनोहर असे त्यांच्या मुलाचे नाव होते. तो आईलासोबत तर घेऊन गेलाच नाही, पण स्वत: देखील वृद्धाश्रमात आला नाही. ज्या आईने त्याला लहानपणापासून सांभाळलं त्याच आईला त्याने घराबाहेर काढलं. त्यामुळे वृद्धाश्रमातच आजींना अखेरचा श्वास घ्यावा लागला.

आजींचे नाव शकुंतलाबाई पळसपगार (७५) असे होते. त्या शेकापूर जवर्डीच्या विसावा वृद्धाश्रमात राहत होत्या. २३ नोव्हेंबरला त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर वृद्धाश्रमाच्या परिसरातच अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांना अखेरपर्यंत त्यांच्या मुलाला भेटता आले नाही. ते सारख्या म्हणायच्या की मी मनोहरच्या घरी चहा प्यायला जाते.

१७ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री कसबा पोलिस कर्मचाऱ्यांना त्या आजी रस्त्यावर पडलेल्या आढळून आल्या होत्या. त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर पोलिसांनी त्यांना विसावा वृद्धाश्रमात आणून सोडलं.

त्यादिवसापासून वृद्धाश्रमाचे ऍड. भास्कर कौतिक्कर, सचिन गणेशराव वानखेडे यांनी त्यांची सेवा केली. त्यांची तब्बेत बरी झाली होती. त्यानंतर त्या वृद्धाश्रमातही रुळल्या होत्या. त्यांना दोन मुलं, मुली, सुना, नातवंडे असा परिवार होता. पण इतका मोठा परिवार असूनही त्यांना वृद्धाश्रमात रहावे लागत होते.

वृद्धाश्रमातील वृद्धांना आजी नेहमी असे म्हणायच्या की मी मनोहरच्या घरी चहा प्यायला जाणार आहे. पण त्यांचा मुलगा त्यांच्या भेटीला कधीच आला नाही. २१ नोव्हेंबरला त्यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा त्या सतत मनोरहचे नाव घेत होत्या. एकदा त्याच्या हातून चहा प्यावा अशी त्यांची इच्छा होती.

त्यावेळी भास्कर कौतिक्कर यांनी आपणच मनोहर असल्याचे सांगत आजींना चहा आणि दूध पाजलं. पण मनोहर आला नाही. अशात २३ तारखेला त्यांचे निधन झाले. मृत्यूनंतर सर्व परिवार त्यांचा उपस्थित होता. अंत्यसंस्कारावेळी कोणी नसल्याने वृद्धाश्रमातील सदस्यांनीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते.

महत्वाच्या बातम्या-
Shikhar Dhawan : अपयशी ठरूनही पंतला संघात स्थान का? संजू सॅमसनला संधी का नाही? अखेर कर्णधार धवनने सांगीतले कारण
Vikram Gokhale death : ‘या’ फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेते विक्रम गोखलेंच्या विरोधात दाखल झाला होता गुन्हा; जाणून घ्या पुर्ण प्रकरण..
ajay devgan : दृश्यम २ च्या छप्पर फाड कमाईनंतर अजय पोहचला काशी विश्वनाथ मंदिरात; म्हणाला, हर हर महादेव

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now