राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या नृत्याच्या व्हिडिओमुळे त्या सतत चर्चेचा विषय बनता. कधी डान्स, गायन तर कधी त्यांचा वेस्टर्न लूकचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होतांना दिसतात.
मागील काही दिवसांपूर्वीच त्यांचे ‘मैंने मूड बना लिया हैं’ या नावाने एक गाणे प्रदर्शित झाले. हे गाणे पंजाबी असून त्यांनी स्वतः गायन आणि नृत्य केलेलं आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. या व्हिडिओला लोकांनी लाखोंच्या संख्येने बघितलं आहे.
तसेच नुकताच त्यांचा सोशल मीडिया स्टार रियाजसोबतचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी त्याच्यासोबत ‘मैंने मूड बना लिया हैं’ या त्यांच्याच गाण्यावर भन्नाट नृत्य करतांना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत आहे.
या व्हिडिओमुळे चर्चेत असतांनाच आता मात्र त्यांच्या संपत्तीमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनल्या आहेत. त्या कोट्यवधीच्या मालकीन आहेत असे समोर आले आहे.
अमृता फडणवीस यांनी शेअर मार्केटमध्ये कोट्यवधीची गुंतवणूक केली आहे. तसेच त्यांच्या एलआयसी मध्येही लाखोंची उलाढाल आहे. २ कोटी ३३ लाख रुपयांची गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये तर ५ लाख ९२ हजार रुपये
एलआयसीमध्ये गुंतवले आहेत.
यासह त्यांच्याकडे सोने आणि शेतजमीनदेखील आहे. त्यांच्याकडे तब्बल ३४ लाखांचे सोने आहे. तसेच जवळजवळ ६० लाख किंमतीची शेतजमीन आहे. नागपूरमध्ये त्यांच्या नावावर एक फ्लॅटदेखील आहे. त्याची किंमत ३५ लाख रुपये असून त्यांच्या नावे काही रक्कमेचे कर्जदेखील आहे. ६२ लाखांचे कर्ज त्यांच्या नावावर आहे.
महत्वाच्या बातम्या
अमृता फडणवीसांपुढे माधुरी दिक्षीतही फेल! डान्सचा ‘हा’ व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
रतन टाटांनी २५ वर्षांपूर्वीचा ‘इंडिका’चा फोटो केला शेअर; भावूक होत म्हणाले, आजही माझ्या ह्रदयात..
devendra fadanvis : पंकजा मुंडे ठाकरे गटात गटात जाणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्या मातोश्रीवर…