Share

जगातील सगळ्यात मोठ्या टॉप 10 पक्षांमध्ये आहे भाजपचा नंबर, वाचा काँग्रेस आणि AAP चा नंबर कितवा

भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करतो. लोक विचारतात की अवघ्या 42 वर्षांपूर्वी स्थापन झालेला पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष कसा बनला? चला जाणून  घेवूया जगातील टॉप-10 राजकीय पक्ष कोणते आहेत? यामध्ये भाजप, काँग्रेस आणि इतर भारतीय पक्षांची संख्या किती आहे?(among-the-top-10-parties-in-the-world-are-bjps-number-read-congress-and-aaps-number)

1. भारतीय जनता पक्ष (BJP): 1980 मध्ये सुरू झालेला भारतीय जनता पक्ष (BJP) आज जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. 18 कोटींहून अधिक लोक पक्षाचे सदस्य झाल्याचा भाजपचा दावा आहे. या अर्थाने, देशाच्या लोकसंख्येपैकी सुमारे 13% भाजप कार्यकर्ते आहेत. सध्या 12 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. भाजप सुरुवातीपासूनच सर्वात मोठा पक्ष आहे, असे नाही. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा भाजपची सदस्य संख्या सुमारे सहा कोटी होती. गेल्या सात वर्षांत 12 कोटींहून अधिक सदस्य वाढले आहेत.

2. चीनी कम्युनिस्ट पार्टी (CCP): या पक्षाची स्थापना चीनमध्ये 23 जुलै 1921 रोजी झाली. तो आता 100 वर्षांत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला आहे. सीसीपीने पक्षाचे नऊ कोटींहून अधिक सदस्य असल्याचा दावा केला आहे.

3. डेमोक्रॅटिक पार्टी (DEM): 8 जानेवारी 1828 रोजी अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना झाली. म्हणजे हा पक्ष सुरू होऊन 194 वर्षे झाली. पक्षाचा दावा आहे की त्यांच्याकडे 4.80 कोटी कार्यकर्ते आहेत.

4. रिपब्लिकन पार्टी (REP): प्रसिद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका हा जगातील चौथा सर्वात मोठा पक्ष आहे. त्याची स्थापना 20 मार्च 1854 रोजी झाली. पक्षाकडे आता 3.57 कोटी कार्यकर्ते आहेत.

5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC): काँग्रेस हा भारतातील सर्वात जुना पक्ष आहे. त्याची स्थापना 1885 मध्ये झाली. काँग्रेसकडे सध्या 1.80 कोटी कार्यकर्ते आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिले तर देशातील 1.60% लोक काँग्रेसचे सदस्य आहेत.

6. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI): PTI ची स्थापना 25 एप्रिल 1996 रोजी पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू इम्रान खान यांनी केली होती. पीटीआयचे सध्या 1.69 कोटी सदस्य आहेत. पक्षाचे निवडणूक चिन्ह बॅट आहे.

7. न्याय आणि विकास पक्ष (JDP): 14 ऑगस्ट 2001 रोजी स्थापन झालेल्या या पक्षाचे 1.10 कोटी सदस्य आहेत. हा तुर्कस्तानमधील सर्वात मोठा राजकीय पक्ष मानला जातो. तुर्कस्तानचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष रजब तय्यप एर्दुगन हे याच पक्षाचे आहेत. त्यापूर्वी ते पंतप्रधानही होते.

8. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK): जगातील दहा सर्वात मोठ्या पक्षांपैकी भारताचा तृतीय पक्ष. AIADMK ची स्थापना 49 वर्षांपूर्वी 17 ऑक्टोबर 1972 रोजी झाली. त्याचे संस्थापक एमजी रामचंद्रन(MG Ramachandran) होते.

9. आम आदमी पार्टी (AAP): आम आदमी पार्टीची स्थापना 26 नोव्हेंबर 2012 रोजी झाली. अवघ्या नऊ वर्षांत या पक्षात सामील होणाऱ्यांची संख्या एक कोटी झाली आहे. पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) आहेत. आता दिल्ली आणि पंजाबमध्ये आपचे सरकार आहे.

10. चामा चा मपिनादुजी (चाचम): टांझानियाचा चामा चा मपिनादुजी हा जगातील दहाव्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्याचे 80 लाख सदस्य आहेत. पक्षाची स्थापना 5 फेब्रुवारी 1977 रोजी ज्युलियस आणि अबोडे जुबे यांनी केली होती.

भारतातील अनेक पक्षांनी त्यांच्या सदस्यांच्या संख्येबाबत कोणताही स्पष्ट दावा केलेला नाही. त्यामुळे त्याचा या यादीत समावेश होऊ शकला नाही. भारतातील ज्या पक्षांनी त्यांची सदस्य संख्या जाहीर केलेली नाही, त्यात समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष, शिवसेना, DMK, AIMIM सारख्या मोठ्या पक्षांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now