काल विधिमंडळात झालेल्या राड्यानंतर चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना आता त्यांच्या गावातच जोरदार राजकीय हादरा बसला आहे. जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या कुटासामध्ये काल कुटासा सहकारी सोसायटी निवडणूक पार पडली. यात मिटकरी यांचा पराभव झाला.
काल कुटासा सहकारी सोसायटी निवडणूक पार पडली यात अमोल मिटकरी यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेस प्रवक्ता कपिल ढोके यांचं ‘कास्तकार’ पॅनल आणि अमोल मिटकरी यांच्या ‘ग्राम स्वराज्य’ पॅनलमध्ये रणधुमाळी झाली.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या ‘ग्राम स्वराज्य’ पॅनलचा पराभव झाला. कांग्रेसचे प्रवक्ता कपिल ढोके यांच्या नेतृत्वाखाली उभे असलेले पॅनल विजय झाले. तर मिटकरी यांच्या संपूर्ण पॅनलचे उमेदवारांचा पराभव झाला.
माहितीनुसार, काल कुटासा सेवा सहकारी सोसायटीमध्ये १३ जागांसाठी मतदान झालं. या संस्थेअंतर्गत एकूण ७६३ मतदार आहेत. यातील ५९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कपिल ढोके यांच्या पॅनलमध्ये आहाद अ.इसाक, इंगळे सारंगधर नामदेव, गावंडे प्रभाकर श्रीराम, गवई सुभाष बालीकराम यांचा विजय झाला.
तसेच, झामरे भास्कर ज्ञानदेव,लाखे सुधाकर धोंडुजी, झामरे विठ्ठल रामेश्वर, झामरे वैभव गजानन, उगले सुनंदा अंबादास, ढोके सागर धनराज, साबळे गणेश पुर्णाजी, निकम शकुंतला चंद्रकांत, कापसे अनंत महादेव या उमेदवारांचाही कपिल ढोके यांच्या पॅनलमध्ये समावेश असून हे सर्व जण विजयी झाले आहेत.
तर अमोल मिटकरी यांच्या पॅनलमध्ये गायकवाड़ कैलास शामराव, झटाले राजू दामोदर, झामरे दशरथ नामदेव, झामरे माणिकराव जगदाराव, झामरे सुनील विश्वासराव, पातोंड रामाभाऊ सुखदेव, सदाफळे संतोष गजानन, गावंडे गजानन विश्वनाथ, कापसे मंगेश रामदास, गावंडे रंजना राजू, थोरात अन्नपूर्णा दामोदर, लाखे शिवाजी अरुण, लताड़ गजानन वासुदेव या उमेदवारांचा समावेश आहे.