राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने राजकारण चांगलेच तापलं आहे. इस्लामपूर येथील कार्यक्रमात मिटकरी यांनी ब्राह्मण व पुरोहितांबाबत भाषणात अपमानास्पद उल्लेख केला. मिटकरी यांच्या याच वक्तव्यावरून राजकीय वातावरण पेटलं आहे.
यावरून राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, मी कुठल्याही समाजाविरोधात बोललो नाही. तसेच माझ्या वक्तव्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असून मी माफी मागणार नाही, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
अमोल मिटकरींच्या वादग्रस्त विधानानंतर ब्राम्हण संघटनांनी त्यांना विरोध करत त्यांच्याविरोधात आंदोलन केले. अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणी थेट मिटकरी यांनी सूचक ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केले आहे.
एका संस्कृत वाक्यात मिटकरींनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. नेहमी परखड मत व्यक्त करणारे मिटकरी या प्रकरणाबाबत बोलताना मौन बाळगणंच श्रेष्ठ असल्याचं म्हणाले आहेत. “वाचा मौनस्य श्रेष्ठम् ll….”असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
https://twitter.com/amolmitkari22/status/1517331714258911233?s=20&t=B4zO42OlunOFoCN5ZH75Hg
दरम्यान, मिटकरी यांच्या ट्विटचा अर्थ असा होतो की, आता वाणीला विराम देणं श्रेष्ठ असल्याचं मिटकरी यांनी आपल्या ट्विटमधून सूचवलं आहे. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे. ‘अमोल मिटकरी यांना सदर विधान करताना मी माइकवर टॅप करुन भाषण थांबविण्याची खूण केली होती, असा दावा देखील जयंत पाटील यांनी केला आहे.
माझ्या उपस्थितीत सदर प्रकार घडल्याने मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असंही पाटील म्हणाले. ‘मिटकरी यांचं हे वैयक्तिक विधान होतं. कोणत्याही समाजाला दुखवण्याचा हेतू नव्हता, असेही पाटील यांनी सांगितले. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या
विमलच्या ऍडमध्ये अक्षय, शाहरूख आणि अजयला पाहून भडकले भाजप नेते, थेट मोदींकडे केली तक्रार
CSK Vs MI : ‘धोनी शांत राहून गेम करतो’, सातव्या पराभवानंतर रोहितने सांगितलं पराजयाचं कारण
खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे ‘KGF 2’ च्या रॉकीभाईची आई; फोटो पाहून थक्क व्हाल
रिंकू राजगुरूच्या पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो पाहून चाहत्यांना झाली श्रीदेवीची आठवण; म्हणाले, कडक आर्ची