Share

पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; राष्ट्रवादीचा सदाभाऊंना खोचक टोला

sadabhau khota

गुरुवारी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी हॉटेलचे बिल न दिल्याने हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोलो येथे हा प्रकार घडला. ‘सदाभाऊ २०१४ चे हॉटेल बिल आहे ते द्या आणि पुढे जावा,’ असे म्हणत त्या व्यक्तीने खोत यांना रोखले आहे. यावेळी तेथे बाचाबाची देखील झाली.

मांजरी येथील अशोक शिनगारे असे या व्यक्तीचे नाव आहे.  या संपूर्ण प्रकरणावर खोत यांनी स्पष्टीकरण देताना म्हंटलं आहे की, ‘मी २०१४ पासून मी १५ वेळा सांगोल्यात आलो आहे. मी त्या माणसाला ओळखत नाही,’ असं खोत यांनी स्पष्ट म्हंटलं आहे. राष्ट्रवादीकडून बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे खोत यांनी यावेळी सांगितलं आहे.

तर दुसरीकडे हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात गेलं आहे. खोत यांनी हॉटेल मालकाविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली. तर दुसरीकडे ‘मी कार्यक्रम संपल्यानंतरही भाऊना पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही असा पवित्रा त्या हॉटेल मालकाने घेतला आहे.

याचाच धागा पकडत आता राष्ट्रवादीने खोत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या,’ असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करत सदाभाऊ खोत यांना लगावला आहे.

 

ट्विटमध्ये मिटकरी यांनी म्हंटले आहे की,’पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या. तुमच्यामुळे त्या हॉटेल मालकाच्या जिवाला धोका निर्माण होतोय अशी सगळीकडे चर्चा आहे. शेतकऱ्यांसाठी पोट फुटेस्तव आंदोलन करा . आणि पवार साहेबांची उंची गाठायला आणखी सात जन्म वाट बघा.’

दरम्यान, खोत यांनी थेट पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे. ‘माझा प्रचार करणारे कार्यकर्ते, पक्षाचे लोक घरातील भाकरी बांधून प्रचार करत होते. माझा एकही कार्यकर्ता त्या काळात हॉटेलमध्ये चहा देखील घेत नव्हता. कारण आमच्याकडे पैसेही नव्हते.,’ असं खोत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं.

तसेच पुढे बोलताना खोत यांनी या राष्ट्रवादीला लक्ष केलं आहे. ‘या प्रकरणामागे राष्ट्रवादीचा नेता आहे. परंतु, टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या या टोमॅटोला सांगतो की असं षडयंत्र रचून सदाभाऊचा आवाज दाबता येणार नाही. याचा शोध मला लागला, पण पोलिसांना अजून का लागला नाही? असा सवाल खोत यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या
उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला आणि गोळीबार; अग्नीपथ योजनेविरोधातील आंदोलन पेटले
‘राष्ट्रपती पदासाठी उंची आणि बौद्धिक पातळी आवश्यक आहे’, सदावर्तेंचा शरद पवारांना टोला
अजय देवगण सोबत झळकलेल्या अभिनेत्रीवर आली भयंकर वाईट वेळ, चेहऱ्यातून काढल्या होत्या ६७ काचा

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now