शिवाजी महाराजांवरील चित्रपट काढणाऱ्या दिग्दर्शकांना अमोल कोल्हेंचा इशारा, तर्कशुद्ध पद्धतीने महाराजांचे…

मराठी अभिनेते अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत.

आग्र्यातल्या लाल किल्ल्यात चित्रित होणारा हा ‘शिवप्रताप गरुडझेप’ पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाबाबत अमोल कोल्हे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांची लाट आणणाऱ्या चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना इशारा दिला.

अमोल कोल्हे म्हणाले, तर्कशुद्ध पद्धतीने महाराजांचे विचार मांडावेत. इतर कोणत्या शिवभक्तीवर मी कमेंट करू शकत नाही. प्रत्येक लेखकाला महाराजांवर काम करायला मिळणं हे स्वप्नवत, इतिहास आपल्या रक्तात आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करण्यापेक्षा त्यांचा जो प्रयत्नवाद आहे तो बिंबवण्याची जास्त गरज आहे.

म्हणाले, महाराजांचा इतिहास अभिनेवेशातून सांगण्यापेक्षा वस्तुस्थितीतून सांगा. तसेच म्हणाले, महाराष्ट्रातील पर्यटक मुंबईतून औरंगाबाद अजंठा वेरूळ लेणी पाहायला जातो. त्याला महाराजांच्या किल्ल्याकडे कसं वळवता येईल याचा विचार झाला पाहिजे.

त्यांनी यावेळी खंत व्यक्त केली म्हणाले, आग्र्यातल्या लाल किल्ल्यात दिसणारी पर्यटकांची रीघ आपल्या किल्ल्यांकडे का दिसत नाही? एकदा महाराजांना दैवत्व दिलं की माझ्या तरूणाईची जबाबदारी संपते. ही खंत अमोल कोल्हे यांनी मुलाखतीत बोलून दाखवली.

चित्रपटात ते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमीका साकारणार आहेत, त्यावर बोलताना म्हणाले, केवळ मुघलच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानला स्वाभिमान काय असतं हे महाराजांनी दाखवून दिलं. कलाकार म्हणून या पेहरावात पाऊल टाकायला मिळणं हे माझं परमभाग्य आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.