अखेर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दिल्याने आता राज्यभरात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात येत आहे. तसेच बैलगाडा शर्यत होत असल्याने बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते.
प्रचारावेळी दिलेला शब्द अमोल कोल्हे यांनी अखेर पूर्ण केला. बैलजोडीसमोर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बारी मारली आली. घोडीवर स्वार होत बैलगाडा शर्यतीचा थरार अमोल कोल्हे यांनी अनुभवला आहे. पुणे जिल्ह्यात असलेल्या निमगावातील असंख्य लोकं बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जमले होते. या शर्यतीचं प्रमुख आकर्षण हे डॉ. अमोल कोल्हे होते.
तसेच आता अमोल कोल्हे यांचे ट्विट व्हायरल झाले आहे. अमोल कोल्हे ट्वीटमध्ये म्हणाले, “भिर्रर्रर्र..! कुलदैवत खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन आज घाटात घोडी धरली आणि भंडाराही उधळला.” कोल्हे यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये प्रचारसभेत दिलेल्या आपल्या आश्वासनाचा आणि घोडेस्वारी करून शब्द पूर्ण केल्याचा व्हिडीओ आहे.
भिर्रर्रर्र..!
कुलदैवत खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन आज घाटात घोडी धरली व भंडाराही उधळला! pic.twitter.com/YoffaLaa6S— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 16, 2022
अमोल कोल्हे यांनी आपला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. तसेच प्रचारादरम्यान कोल्हे म्हणाले होते, “हा अमोल कोल्हे मालिका विश्वातून निवृत्ती घेणार आणि तुमच्या सेवेसाठी उपस्थित असणार आहे. तसा दुसरा शब्द बैलगाडा मालकांना देतो. ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी पुढे घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना टोला लगावला होता. “प्रचारादरम्यान अमोल कोल्हे म्हणाले होते की बैलगाडा शर्यती सुरू होतील तेव्हा हा पठ्ठ्या बारीच्या पुढे पहिल्या बारीवर बसेल. म्हणून मी त्यांना विनंती केली. निवडणुकीत जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यासाठी का होईना आमच्या घाटात या,” असे म्हणाले होते.
आज (१६ फेब्रुवारी) खेडमधील दावडी लिंबगाव येथे मानाच्या खंडोबा घाटात बैलगाडा शर्यत पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने अटी आणि शर्थींसह बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर मावळमधील नाणोली, आंबेगाव येथील लांडेवाडी येथे बैलगाडा शर्यती पार पडत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
गड चढत असताना तरुणाचा मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर….
गंगूबाई काठियावाडी वादाच्या भोवऱ्यात; मुलगा म्हणाला, ‘आई सोशल वर्कर होती फिल्ममध्ये वेश्या दाखवलं’
डोनाल्ड ट्रम्प यांचा नाद नाय! सोबत फोटो काढायला २२ लाख आणि चहा प्यायला घेतात तब्बल ‘एवढे’ रुपये
हत्या करुन सुप्रियाला सोफासेटमध्ये डांबलं; डोंबिवलीतील घटनेमुळे महाराष्ट्र हादरला






