सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी उठवली आहे. बैलगाडा शर्यतीवर काही संघटनांनी विरोध दर्शविला होता. यानंतर बैलगाडा शर्यतीचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. राज्यात देखील बैलगाडा शर्यतीवरून बराच वाद निर्माण झाला होता. (amol kolhe riding a horse at nimgaon davdi)
अखेर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दिल्याने आता राज्यभरात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात येत आहे. तसेच बैलगाडा शर्यत होत असल्याने बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते.
प्रचारावेळी दिलेला शब्द अमोल कोल्हे यांनी अखेर पूर्ण केला. बैलजोडीसमोर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बारी मारली आली. घोडीवर स्वार होत बैलगाडा शर्यतीचा थरार अमोल कोल्हे यांनी अनुभवला आहे. पुणे जिल्ह्यात असलेल्या निमगावातील असंख्य लोकं बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जमले होते. या शर्यतीचं प्रमुख आकर्षण हे डॉ. अमोल कोल्हे होते.
खा.डॉ.अमोल कोल्हे मानल तुम्हाला!
योग्य निर्णय! राजकीय घाटात घोडीवर बसण्यापेक्षा देवाच्या दारात आपला दिलेला शब्द पुर्ण केला!
खुप खुप धन्यवाद!@kolhe_amol @NCPspeaks pic.twitter.com/dCcbpAqQ9e— Amol Kavale (@amol_kavale) February 16, 2022
यावेळी अमोल कोल्हे यांनी आपला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. तसेच प्रचारादरम्यान कोल्हे म्हणाले होते, “हा अमोल कोल्हे मालिका विश्वातून निवृत्ती घेणार आणि तुमच्या सेवेसाठी उपस्थित असणार आहे. तसा दुसरा शब्द बैलगाडा मालकांना देतो. ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी पुढे घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना टोला लगावला होता. “प्रचारादरम्यान अमोल कोल्हे म्हणाले होते की बैलगाडा शर्यती सुरू होतील तेव्हा हा पठ्ठ्या बारीच्या पुढे पहिल्या बारीवर बसेल. म्हणून मी त्यांना विनंती केली. निवडणुकीत जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यासाठी का होईना आमच्या घाटात या,” असे म्हणाले होते.
आज (१६ फेब्रुवारी) खेडमधील दावडी लिंबगाव येथे मानाच्या खंडोबा घाटात बैलगाडा शर्यत पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने अटी आणि शर्थींसह बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर मावळमधील नाणोली, आंबेगाव येथील लांडेवाडी येथे बैलगाडा शर्यती पार पडत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
बँकेच्या महाघोटाळा उघड झाल्यानंतर निर्मला सीतारमण यांनी दाखवले काँग्रेस सरकारकडे बोट, म्हणाल्या..
राखी सावंतला हात लावण्याचा प्रयत्न करत होता चाहता, कॅमेऱ्यात कैद झाली पुर्ण घटना, पहा व्हिडीओ
हिजाब वाद: ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांना १२वी टॉपर अरुसा परवेझने दिले सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाली..
राकेश बापटने शेअर केला शमिता शेट्टीसोबतचा रोमँटिक व्हिडिओ; एक्स पत्नीने केली ‘ही’ कमेंट…