amol kolhe mike off | छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर भाजप नेते वादग्रस्त वक्तव्ये करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. अशात संसदेने एक खास कायदा करावा अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.
अमोल कोल्हे हे संसदेत नवा कायदा करण्यासाठी बोलत होते. पण त्यांच्या तीन वाक्यानंतरच त्यांचा माईक बंद करुन पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज देव नाही, पण ते देवापेक्षा कमी नाही. त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्याची कोणाची हिंमत होता कामा नये, असे अमोल कोल्हे बोलत होते. त्यावेळी राजेंद्र अग्रवाल यांनी आपका हो गया हो गया असे म्हणत विषय थांबवण्याचा प्रयत्न केला.
अमोल कोल्हे थांबत नव्हते. पण त्यानंतर त्यांचा माईक बंद करुन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. संसदेत घडलेल्या या घटनेमुळे अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. त्यावेळी त्यांनी नवीन कायद्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि शिंदे गटातील नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे आज संसदेत बोलताना अमोल कोल्हे यांनी शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्यांसंदर्भात संसदेने एक कायदा करावा, अशी मागणी केली आहे.
अमोल कोल्हे हे बोलत असताना राजेंद्र अग्रवाल अचानक त्यांना थांबवू लागले. त्यावेळी खाली बसण्याची सुचना कोल्हेंना दिली. पण कोल्हे खाली बसले नाही. त्यानंतर अमोल कोल्हे संतापले. हमें बोलने दिजीए म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत अमोल कोल्हेंचा माईक बंद करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या-
Bhagatsing koshyari : भगतसिंग कोश्यारी आणि ‘या’ अभिनेत्रीने बोगस लग्ने लावून…; गंभीर आरोपांनी उडाली खळबळ
क्रिकेट खेळत असताना दहावीच्या विद्यार्थ्याला आला हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात जाण्याआधीच मृत्यू
Noori Parveen : उपचारासाठी पेशंटकडून फक्त 10 रुपये घेते ‘ही’ महीला डॉक्टर; म्हणते ‘पैसे नाही तर लोकांची सेवा करणं महत्त्वाचं’