amol kohle trying to leave ncp | शिवसेना फुटल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसही फुटणार असल्याची चर्चा वारंवार होताना दिसून येत आहे. भाजपचे अनेक नेते म्हणताना दिसून येत आहे की, राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपमध्ये येणार आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.
अशात राष्ट्रवाीचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज नाराज असल्यामुळे ते लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या शिबिरासाठीही ते गैरहजर होते.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमोल कोल्हे खरंच भाजपच्या वाटेवर आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचारक आहेत. पण गुजरात विधानसभा निवडणूकीच्या स्टार प्रचारक यादीतून अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलं आहे.
अमोल कोल्हे यांचे नाव यादीतून वगळण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही ठीक नसल्याची चर्चा आहे. अमोल कोल्हे हे नाराज असून ते लवकरच पक्ष सोडू शकतात, असेही म्हटले जात आहे. पण अमोल कोल्हे यांनी अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
गेल्या तीन वर्षांपासून अमोल कोल्हे त्यांच्या मतदार संघात वेळ देत नाहीये, असा आरोप वारंवार केला जात आहे. तसेच ते सेलिब्रिटी असल्यामुळे काही वरिष्ठ नेत्यांनांही अडचण होत आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांसोबतच राष्ट्रवादीचे नेतेही अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना दिसून येत आहे.
तसेच अमोल कोल्हे यांचे मधल्या काळामध्ये भाजप नेत्यांशी जवळीक वाढल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळीही ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले होते. त्यामुळेही ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होत होती.
महत्वाच्या बातम्या-
गर्लफ्रेंडचे पत्र वाचताच अक्षय केळकर ढसाढसा रडला, म्हणाला, “आठ वर्षांचं प्रेम आहे माझं पण…
urvashi rautela : चित्रपट फ्लॉप ठरुनही करोडोंची मालकीन आहे उर्वशी, ‘या’ व्यवसायातून करते बक्कळ कमाई
भगवान कृष्णाची भूमी द्वारका मशिदी अन् दर्ग्यांनी वेढली; एका क्षणात केले सर्वकाही उद्धवस्त…