AMMK Exit from the BJP led NDA Alliance: तामिळनाडूच्या (Tamil Nadu state) राजकीय पटावर मोठं उलथापालथ घडवणारा निर्णय घेत टीटीव्ही दिनकरन (TTV Dhinakaran leader) यांच्या अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम (AMMK party Tamil Nadu) पक्षाने भाजपच्या (BJP party India) नेतृत्वाखालील एनडीए आघाडीतून (NDA alliance India) बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेतल्याने आघाडीच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विश्वासघातामुळे घेतला निर्णय
दिनकरन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “आमचं आंदोलन काही लोकांच्या विश्वासघाताविरुद्ध उभं राहिलं होतं. आम्हाला वाटलं होतं की ते बदलतील, पण तसे काही घडलं नाही.” त्यामुळेच पक्षाने एनडीएला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
एआयएडीएमकेशी मतभेद ठळक
2023 मध्ये वेगळा झालेला एआयएडीएमके (AIADMK Tamil Nadu party) पुन्हा एप्रिल 2025 मध्ये भाजपसोबत आला. मात्र, या युतीत एएमएमकेला स्थान मिळालं नाही. दिनकरन यांनी थेट आरोप केला की, पक्षनेते पलानीस्वामी (Edappadi Palaniswami AIADMK) यांनी त्यांच्या पक्षाला आघाडीत सामील होऊ दिलं नाही. त्यांना अपेक्षा होती की अमित शाह (Amit Shah BJP leader) यावर हस्तक्षेप करतील, पण असं काही झालं नाही.
इतर घटकपक्षांमध्ये असंतोष
एएमएमके हा एनडीए सोडणारा दुसरा घटक पक्ष आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम (O Panneerselvam former CM) यांनी स्वतःच्या पक्षासह एनडीएचा निरोप घेतला होता. याशिवाय पीएमकेमध्ये (PMK party Tamil Nadu) रामदास (Ramadoss PMK leader) आणि अंबुमणी (Anbumani PMK leader) यांच्यात वाद असल्याने, ते एनडीएमध्ये राहतील की नाही, याबाबत संभ्रम आहे. डीएमडीके (DMDK Tamil Nadu party) देखील अशाच स्थितीत आहे.
दरम्यान, नाम तमिळर कच्ची (NTK Tamil Nadu party) आणि टीव्हीके (TVK Tamil Nadu party) यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत एएमएमकेचा एक्झिट हा राज्याच्या राजकीय समीकरणांना मोठा धक्का आहे.
2026 विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी
2026 मध्ये होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुका निर्णायक ठरणार आहेत. दिनकरन यांनी स्पष्ट केले की, “आम्ही योग्य मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासाठी आतुर होतो. पण जेव्हा आम्ही पाहिलं की काही नेते आपला विश्वासघात डोक्यावर घेऊन गावोगाव फिरत आहेत, तेव्हा समजलो की ते कधीच बदलणार नाहीत. त्यामुळे आमच्यासाठी दुसरा मार्गच उरला नाही.”
डिसेंबरमध्ये पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून नवी आघाडी करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही दिनकरन यांनी सूचित केले.