Share

अजय देवगणच्या ‘या’ गोष्टीवर नाराज झाले अमिताभ, फोटोवर कमेंट करत सुनावले, म्हणाले..

बॉलिवूड अभिनेते अजय देवगण ( Ajay Devgn) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. नुकताच दोघांचा रनवे 34 (Runway 34) हा चित्रपट प्रदर्शित झाला. अजयने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘बोल बच्चन’ या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अजय आणि बिग बी एकत्र दिसले होते. चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अजयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत अजय आणि रोहित शेट्टी दिसत आहेत. अमिताभ बच्चन या फोटोत नसल्यामुळे बिग बी संतप्त झाले आहेत. अजयच्या पोस्टवर त्यांनी कमेंट केली आहे.

अजय देवगणने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बंदूक घेऊन उभा आहे आणि रोहित शेट्टी कॅमेरा धरून शूटिंग करत आहे. फोटो शेअर करताना अजयने लिहिले आहे की, दोन बोल बच्चन एकमेकांना शूट करत आहेत. बोल बच्चनला 10 वर्ष पूर्ण.

अजयच्या या पोस्टवर कमेंट करण्यापासून अमिताभ बच्चन स्वतःला रोखू शकले नाहीत. त्याने लिहिले, ‘अरे यार, तिसर्‍यालाही बोलवा, गोळी मारू नका.’ अजय देवगणही बिग बींच्या कमेंटला उत्तर देण्यापासून मागे हटला नाही. त्याने लिहिले ‘ओजी बच्चन यांना कोणत्याही आमंत्रणाची गरज नाही.’

बोल बच्चनबद्दल बोलायचे झाले तर हा अॅक्शन-कॉमेडी चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिषेक बच्चन, असिन, प्राची देसाई, अर्चना पूरण सिंग आणि कृष्णा अभिषेक महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन लवकरच रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासोबत ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहेत. त्याचबरोबर अजयकडे चित्रपटांची झुंडच आहे. नुकतेच त्याने भोला या चित्रपटाची घोषणा केली असून तो दिग्दर्शित करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
अजय देवगणवर टीका करताना KRK कडून झाली मोठी चूक, लोकांनी केले ट्रोल, म्हणाले
फूल और कांटे मधून हिट झालेला अजय देवगण आहे एवढ्या कोटींचा मालक, प्रायवेट जेटमधून करतो प्रवास
..तर मग आज अजय देवगणच्या पत्नीचे नाव काजोल नसते, शोमू मुखर्जींनी ठरवलं होतं हे नाव
अजय देवगणच्या प्रेमात वेडी झाली कंगना; ब्रेकअप झाल्यावर म्हणाली, विवाहित पुरुषासोबत राहून चूक केली…

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now