राजू अमिताभचा(Amitabh Bachchan) मोठा चाहता होता हे क्वचितच कोणापासून लपून राहीले असेल. तो त्याचे करिअर घडवण्यासाठी मुंबईत आला तेव्हा त्याला अमिताभच्या मिमिक्रीशिवाय काहीच माहीत नव्हते. राजू श्रीवास्तवने लहानपणापासून फक्त अमिताभचेच चित्रपट पाहिले होते. अमिताभच्या प्रत्येक चित्रपटातील संवाद राजूला आठवतात. एका मुलाखतीत राजूने स्वतः या प्रकरणाची संपूर्ण कहाणी सांगितली. राजूने सांगितले की, अमिताभमुळे त्याला कसे काम मिळाले. तो मेगास्टारला पहिल्यांदा कसा भेटला?(amitabh-earned-a-living-as-raju-srivastava-recounts-his-struggle-days)
राजूने(Raju Shrivastav) एका मुलाखतीत सांगितले की त्याची मिमिक्री कशी सुरू झाली. राजू शाळेत शिकत असे तेव्हा त्याला अभ्यास करायला आवडत नसे. तो फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीची वाट पहायचा. कारण वर्गात मॅडम विचारतात की कार्यक्रमात कोण भाग घेणार. राजू लहानपणी इंदिरा गांधींची( Indira Gandhi) नक्कल करायचा. पण एके दिवशी त्यानी शोले चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर राजूने स्वतः अमिताभच्या शैलीत बोलायला सुरुवात केली. सायकल काढण्यासाठी त्यानी पार्किंग करणाऱ्या व्यक्तीशी अमिताभच्या स्टाईलमध्ये चर्चाही केली. त्या दिवसापासून तो अमिताचा चाहता झाला.
राजू श्रीवास्तवने(Raju Shrivastav) सांगितले की, मुंबईत आल्यावर कामाच्या शोधात रोज भटकंती करावी लागत होती, मात्र काहीच होत नव्हते. त्यानंतर त्यानी स्ट्रीट बँड-ऑर्केस्ट्राच्या सदस्यांशी संवाद साधला. त्यांना राजूने अमिताभची नक्कल करून दाखवली. त्यावेळी अमिताभची नक्कल करणारा कलाकार नव्हता. त्यावेळी देवानंद, दिलीप कुमार, ओम प्रकाश, शत्रुघ्न सिन्हा यांची नक्कल करणारे अनेक होते. जे त्यांना खूप आवडले. राजूने सांगितले,”पहिल्यांदा मला 50 रुपये दिले, जेवण दिले. त्यानंतर 75 रुपये दिले आणि त्यानंतर दोन वर्षे 200 रुपये देत राहिले. ”
शूटिंग सेटवर राजू पहिल्यांदाच अमिताभ बच्चनला भेटला होता. राजूने टिनू आनंदला विनंती केली होती. राजू म्हणाला, “त्या दिवसांत अमिताभ मैं आझाद हू ची शूटिंग करत होते. मी टिनू जींना विनंती केली होती. त्यांनी अमित जींना सांगितले, अहो अमित हा राजू श्रीवास्तव आहे. तुमची खूप छान कॉपी करतो. अनेक दिवसांपासून तुम्हाला भेटायला येत आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, कुठला आहेस, मी घाई घाईत त्यांना सगळी स्टोरी सांगितली की तुम्ही माझे नातेवाईक आहात या आधी की सिक्युरिटी मला हाकलून देईल.
राजू म्हणाला की, “मी त्यांना सगळं सांगितलं, तो गप्पच राहिला. मग मला समजलं की ते मला पाहत होते पण ऐकत नव्हते. ते त्यांचा डायलॉग आठवत होते. थोड्या वेळाने ते उठले आणि म्हणाले हो भाऊ, चल शूटिंग सुरू करू. हा शबाना जी, काय सीन आहे , काय शॉट आहे . एवढ्यात सिक्युरिटी आला आणि म्हणाला, हो भाऊ झालं तुझ, चल. यानंतर राजूने सांगितले की काही वर्ष उलटून गेली . एक प्रसंग तो ही आला म्हणतात ना, कष्टाचे फळ मिळते. एक वेळ अशी आली जेव्हा आम्ही भेटलो आणि मी त्यांना माझ्याबद्दल सांगू लागलो. त्याआधी ते म्हणाले अरे भाऊ, तुला काही सांगायची गरज नाही. आम्ही तुझे कार्यक्रम पाहतो. तू खूप छान करत आहेस. ”
एक काळ असा होता जेव्हा राजू श्रीवास्त स्वतः बिग बींच्या मूर्तीसमोर उभे राहून कॉमेडी करत होता. हा तो काळ होता जेव्हा राजू श्रीवास्तव बिग बॉसच्या 3(Big Boss 3) सीझनमध्ये सामील झाला होता. या सीझनचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करत होते. राजूची ओळख करून देताना अमिताभ म्हणाले होते, लोकांनी युद्धातून जग जिंकले आहे, ताकदीने जिंकले आहे. पण आमच्या या स्पर्धकाने हसत जग जिंकले. राजू म्हणाला, सर तुमचे चित्रपट बघून हा राजू श्रीवास्तवही तुमच्याकडून शिकत कलाकार झाला.
आणखी एक वेळ आली जेव्हा राजूने मुंबई पोलिसांसाठी समर्पित कार्यक्रमात परफॉर्म केले. या कार्यक्रमात अमिताभ आपल्या कुटुंबासह उपस्थित होते. या शोमध्ये राजूने एक विनोद ऐकवला. राजूने असा जोक सांगितला, बिग बीही हसत हसत बेभान झाले.
अमिताभजींना फिरावेसे वाटले. ते ड्रायव्हरला म्हणाले. गाडी काढ, चल फिरून येऊ. ड्रायव्हरला सांगितले की तु मागे बस, मी गाडी चालवतो. त्यांची गाडी ट्रॅफिक सिग्नलवर थांबवली गेली. हवालदाराने थांबवले आणि बघून थक्क झाला. त्यांच्या साहेबांना फोन केला आणि म्हणाले लवकर या आणि कमिशनर साहेबांना पण घेऊन या. लवकर या सर, नाव माहित नाही खूप मोठा माणूस आहे, त्याने अमिताभ बच्चन यांना ड्रायव्हर म्हणून ठेवले आहे.
अमिताभ हेही राजूचे चाहते आहेत. त्यामुळे तर जेव्हा तो आजारी पडला, तेव्हा त्यांनी अनेकदा मेसेज केले. बेशुद्ध अवस्थेत राजूला शुद्धीवर आणण्यासाठी अमिताभचा आवाज ऐकू आला. अमिताभ यांनी स्वतः रेकॉर्ड करून त्यांचा आवाज पाठवला.