बॉलीवूडमधील सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटींबद्दल बोलायचे झाले तर त्यात कमाल आर खान (KRK) चे नाव नक्कीच घेतले जाईल. स्वत:ला निर्माता, अभिनेता आणि चित्रपट समीक्षक म्हणवणाऱ्या केआरकेने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याचे बोलणे इतके वाढले होते की, आता त्याला कोर्टाने आदेश दिले होते की, तो सलमान खानबद्दल (Salman Khan) काहीही बोलणार नाही.(Kamal R. Khan, Amitabh Bachchan, Biography)
https://twitter.com/kamaalrkhan/status/1529489118354456579?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1529489118354456579%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fmovie-masti%2Fnews-from-bollywood%2Famitabh-bachchan-fans-slam-him-for-promoting-kamaal-r-khan-aka-krk-biography%2Farticleshow%2F91797227.cms
आता बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांनी केआरकेची बायोग्राफी लॉन्च केली आणि त्यानंतर ते लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. केआरकेने आदल्या दिवशी ट्विट केले होते, ‘माझी बायोग्राफी कॉन्ट्रोव्हर्शियल केआरके आज लॉन्च होणार आहे.’ रणबीर पुष्पाने केआरकेवर एक पुस्तक लिहिले आहे. ‘बायोग्राफी ऑफ द मोस्ट कॉन्ट्रोव्हर्सियल केआरके’ असे पुस्तकाचे नाव आहे.
https://twitter.com/theprayagtiwari/status/1529485576604225537?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1529485576604225537%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fmovie-masti%2Fnews-from-bollywood%2Famitabh-bachchan-fans-slam-him-for-promoting-kamaal-r-khan-aka-krk-biography%2Farticleshow%2F91797227.cms
अमिताभ बच्चन यांनी या बायोग्राफीबद्दल ट्विट केले. अमिताभ यांच्या या ट्विटला उत्तर देताना केआरकेने त्यांचे आभार मानले आहेत, पण बिग बींचे चाहते त्यांच्यावर नाराज झाल्याचे दिसत आहे. अमिताभ यांच्या या ट्विटवर लोकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका चाहत्याने लिहिले, “सर, तुम्ही अशा फालतू लोकांचे व्हिडिओ कधी शेअर करायला सुरुवात केली? कृपया असे करू नका. असे करून तुम्ही स्वतःची लेवल कमी करत आहात.
https://twitter.com/sailorsmoon/status/1529492675577008128?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1529492675577008128%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fmovie-masti%2Fnews-from-bollywood%2Famitabh-bachchan-fans-slam-him-for-promoting-kamaal-r-khan-aka-krk-biography%2Farticleshow%2F91797227.cms
https://twitter.com/Dishaaa_soni/status/1529485264581586946?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1529485264581586946%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fmovie-masti%2Fnews-from-bollywood%2Famitabh-bachchan-fans-slam-him-for-promoting-kamaal-r-khan-aka-krk-biography%2Farticleshow%2F91797227.cms
अमिताभच्या या ट्विटवर त्यांच्या एका चाहत्याने लिहिले की, ‘केआरकेकडे तुमचा काही व्हिडिओ आहे का सर?’ दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ‘काय दिवस आले आहे सर तुम्ही केआरकेचे प्रमोशन करत आहात?’ नाराजी व्यक्त करत बिग बींच्या एका चाहत्याने लिहिले की, ‘मालिक, एवढे वाईट दिवस तर एबीसीएल बुलाडी तेव्हाही आले नसतील. नक्की काय मजबूरी आहे?’
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन शेवटचे अजय देवगण सोबत ‘रनवे 34’ मध्ये दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. आता अमिताभ रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय ते ‘गुडबाय’ चित्रपटात नीना गुप्ता आणि रश्मिका मंदान्नासोबत दिसणार आहे. बिग बी लवकरच दीपिका पदुकोणसोबत हॉलिवूड चित्रपट ‘द इंटर्न’च्या रिमेकमध्ये काम करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
चक्क अमिताभ बच्चनलाही पडली महाराष्ट्राची हास्यजत्राची भुरळ, प्रसाद ओकने सांगितला किस्सा
अमिताभ बच्चन अभिषेकला रोज महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायला सांगतात; प्रसाद ओकने शेअर केला भन्नाट किस्सा
बॉलिवूडवर शोककळा! अमिताभ बच्चनला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं दुःखद निधन
मृत्यूच्या वेळी गर्भवती होती ही अभिनेत्री; अमिताभ बच्चनसोबत या चित्रपटात केलं होतं काम