Share

नागराज मंजुळे रॉक्स! दुसऱ्या दिवशीही ‘झुंड’ने विक्रमी कमाई करत गाठला नवीन टप्पा, कमावले ‘एवढे’ कोटी

Jhund

नागराज मंजुळे यांचा बहुप्रतिक्षित ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, सैराट जोडी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर मुख्य भूमिकेत असलेला ‘झुंड’ या चित्रपटासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तर शुक्रवारी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली. चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरत असून दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आहे.

‘झुंड’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाने कमाई केलेल्या आकडे दर्शविणारा एक ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, ‘झुंड चित्रपट प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत आणि महाराष्ट्रातील इतर काही भागात चांगला व्यवसाय केला आहे. पण काही भागात विशेषतः उत्तर भारतात कमाईचे आकडे खूपच कमी आहेत’.

‘चित्रपटाने शनिवारी २.२० कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारी म्हणजेच पहिल्या दिवशी १.५ कोटींचा व्यवसाय केला होता. तर चित्रपटाची भारतातील एकूण कमाई ३.६० कोटी इतकी आहे. त्यानुसार आता तिसऱ्या दिवशी चित्रपटाने पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या एकूण कमाईच्या तिप्पट कमाई करणे गरजेचे आहे’.

दरम्यान, ‘झुंड’ हा नागराज मंजुळे यांचा पहिलावहिला हिंदी चित्रपट आहे. हिंदीतील पदार्पणातच त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. अभिनेता आमिर खानने अमिताभ बच्चन यांना या चित्रपटासाठी शिफारस केली होती. आमिर चित्रपटाचे स्क्रिप्ट ऐकून फारच प्रभावित झाला होता. त्यामुळे त्यानेच अमिताभ बच्चन यांना भूमिका पटवून देऊन त्यांना भूमिकेसाठी तयार केले.

‘झुंड’ हा चित्रपट क्रीडा प्रशिक्षक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. विजय बरसे हे एक निवृत्त क्रिडा शिक्षक होते. त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉलची ट्रेनिंग दिली होती. तसेच त्यांनी स्लम सॉकर नावाच्या एनजीओचीही स्थापना केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय बरसे यांची भूमिका साकारली आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी काही सेलिब्रिटींसाठी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. तर अभिनेता आमिर खान, धनुष तसेच बॉलिवूडमधील काही दिग्दर्शकांनी झुंड चित्रपट पाहून चित्रपट, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे भरभरून कौतुक केले होते.

महत्त्वाच्या बातम्या :
धर्मेंद्रचा भाऊ वीरेंद्रचा शुटिंगदरम्यानच झाला होता मृत्यू, आजपर्यंत उलगडले नाही रहस्य
“महानायकाला अन् महामानवाला एकाच फ्रेममध्ये आणलं, हा सिनेमा बनवून तू आमच्यावर उपकार करतोयस”
आशिकी २ मधील प्रसिद्ध गायक अंकित तिवारीवर झाला होता बलात्काराचा आरोप; आता जगतोय ‘असे’ आयुष्य

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now