Share

Amitabh bachchan : अमिताभ बच्चनची नस कापली, पायात धातूचा तुकडा, भयंकर रक्तस्राव; KBC च्या सेटवर गंभीर दुर्घटना

Amitabh Bachchan

Amitabh bachchan injured at kbc set   प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन काही दिवसांपूर्वी चांगलेच चर्चेत आले होते. कारण त्यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पायाची नस कापल्या गेल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांनी स्वत: त्यांच्या एका ब्लॉगद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

ही घटना मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत लोकप्रिय टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती १४ च्या सेटवर घडली होती. जिथे अचानक त्याच्या डाव्या पायाची नस कापली गेली, ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तसेच त्यांच्या पायवर टाके सुद्धा पडले होते.

कौन बनेगा करोडपती १४ च्या सेटवर त्यांच्या पायाची नस कापली गेल्याचे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले. ब्लॉगमध्ये त्यांनी असेही सांगितले की, दुखापतीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्या जखमेवर टाके मारण्यात आले.

तसेच पुढे बोलताना अमिताभ बच्चन यांनी आता ते पूर्णपणे बरे असल्याचीही पुष्टीही केली आहे. हा ब्लॉग येण्याआधी सोशल मीडियावर ही माहिती उपलब्ध नव्हती, मात्र ब्लॉग प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावरील त्यांचे चाहते चांगलेच चिंतेत पडले होते.

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, ‘कौन बनेगा करोडपती १४’ च्या सेटवर त्यांच्या डाव्या पायामध्ये धातूचा तुकडा घुसला होता, त्यामुळे तेथील नस कापली गेली होती. त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, नस कापताच पायातून रक्तस्त्राव सुरू झाला. मात्र, कसे तरी मला डॉक्टरांकडे नेण्यात आले.

रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर तेथे त्यांच्या जखमेवर टाके घालण्यात आले. रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांच्या मदतीने या दुखापतीवर योग्यवेळेत उपचार करता आले. त्यांनी पुढे लिहिले की, केबीसीसाठी शूटिंग करताना मला स्वतःची काळजी घ्यावी आधीच सांगितले होते.

तसेच डॉक्टरांनी त्यांना ट्रेडमिलवर अजिबात धावू नये असा सक्त सल्ला दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी लिहिले की, डॉक्टरांनी मला जास्त वेळ उभे राहू नये असे सांगितले आहे. जास्त चालू नका आणि ट्रेडमिलवर व्यायाम करू नका असेही सांगितले आहे. या दुखापतीमुळे शरीरावर काही डाग पडतील असेही सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Ketki Chitale : तुमचा धर्म विसरु नका…; दिवाळीच्या ‘अशा’ शुभेच्छा देणाऱ्यांवरच भडकली केतकी चितळे
IND Vs PAK : भारताला चीटर म्हणणाऱ्या पाकिस्तानची ICC ने केली बोलती बंद, थेट दिला ‘त्या’ ३ धावांचा पुरावा
Usmanabad : महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरात आहे जादूई दगड; थेट सांगतो भविष्य अन् देतो प्रश्नांची उत्तरे

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now