बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या ‘दसवी’ या चित्रपटामुळे माध्यमात फारच चर्चेत आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गुरुवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यादरम्यान अभिषेक बच्चन या चित्रपटाचे जोरदार प्रमोशनसुद्धा करत आहे. अशात अभिषेकचे वडिल बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीसुद्धा त्याला प्रोत्साहन देताना दिसून येत आहेत.
अमिताभ बच्चन मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाद्वारे अभिषेक बच्चनच्या ‘दसवी’ चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. पण काही लोकांना मात्र अमिताभ यांनी त्यांच्या मुलाच्या चित्रपटाचे प्रमोशन करणे काही रूचले नाही. त्यामुळे ते अमिताभ यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. तर आता मुलाबाबतची गोष्ट असल्याने अमिताभ बच्चनही गप्प न बसता त्यांनी एक ट्विट करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले.
अमिताभ यांनी ट्विटरवर कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता एक ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी हिंदीत लिहिले की, ‘जी हां हुजूर, मैं करता हूं : बधाई, प्रचार, मंगलाचार !!! क्या कर लोगे…??’ अमिताभ यांचा हा ट्विट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेक लोक त्यांच्या या ट्विटला पसंती दर्शवत आहेत. तसेच त्यावर कमेंटही करत आपली प्रतिक्रिया देत आहेत.
https://twitter.com/SrBachchan/status/1511760980870852609?s=20&t=mfVPXVz6nZxLKd8SmVdgnQ
यापूर्वी अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत अभिषेकचे बच्चनचे कौतुक केले होते. त्यांनी पोस्टमध्ये अभिषेकच्या ‘दसवी’ चित्रपटाचा एक पोस्टर शेअर केला होता. या पोस्टरसोबत त्यांनी लिहिले होते की, ‘मोठ्या मोठ्या शहरात आमचे मोठे मोठे फोटो लागतात’ – गंगाराम चौधरी. ‘माझा मुलगा, माझा मुलगा असल्याने उत्तराधिकारी किंवा वारसदार होत नाही. तर जो माझा वारसदार होणार तो माझा मुलगा असणार’ – हरिवंशराय बच्चन’.
अमिताभ यांनी पुढे लिहिले की, ‘अभिषेक बच्चन माझा उत्तराधिकारी आहे, माझा वारसदार आहे, माझा गर्व आहे. अभिषेक अभिमान आहे तुझा’. दरम्यान, अभिषेक बच्चनच्या ‘दसवी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केलं आहे. तर दिनेश विजय यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. यामध्ये अभिषेकने गंगाराम चौधरी नावाच्या एका भ्रष्ट नेत्याची भूमिका साकारली आहे. हा नेता जास्त शिकलेला नसतो. तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तो जेलमध्ये जातो.
हा नेता जेलमध्येच राहून दहावीची परिक्षा देण्याचे ठरवतो. अभिषेकसोबत या चित्रपटात यामी गौतम आणि निम्रत कौर मुख्य भूमिकेत आहेत. यामीने चित्रपटात जेलरची भूमिका साकारली आहे. तर निम्रत कौर गंगा राम चौधरींची पत्नी बिमला देवीच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण आगरा जेलमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
रेखासोबत केला टाईमपास, हेमासोबत मंदिरात लग्न करायला गेले पण.., जितेंद्र यांची लव्ह लाईफ वाचून अवाक व्हाल
..तर लोकं मला चपलीने मारतील; अभिनेता शरद केळकरने व्यक्त केली भिती
रात्रभर त्रास सहन करत राहिली भारती सिंग, लेबर पेन होत असतानाही ‘या’ कारणामुळे केला व्हिडीओ शुट