सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात भाषणाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र दुसरीकडे राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आनंदाचं वातावरण आहे. याचे कारण असे की, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे हे आजोबा झाले आहे.
मंगळवारी राज ठाकरे यांच्या सूनबाई आणि अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. मिताली ठाकरे यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. राज ठाकरेंच नवं घर शिवतीर्थ येथे या नव्या पाहुण्याच मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलं.
विशेष बाब म्हणजे अमित ठाकरेंना पुत्ररत्न झाल्याचं समजताच शिवतीर्थावर पेढे वाटप करण्यात आले. नातवाच्या आगमनाने राज ठाकरे आजोबा तर शर्मिला ठाकरे या आजी झाल्या आहेत. एवढंच नाही तर मनसे कार्यकर्त्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.
तर दुसरीकडे राज ठाकरे हे आपल्या नातवाचं नाव काय ठेवतात, याबद्दलही काहींना आतापासून उत्सुकता लागल्याचं सोशल मीडियावर दिसून येत आहे. अशातच एक फोटो सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. राज ठाकरे यांच्या नातवाचे फोटो सध्या वाऱ्यागत व्हायरल होतं आहेत.
दरम्यान, गेल्या 2019 मध्ये धुमधडाक्यात अमित ठाकरे आणि मिताली बोरुडचा विवाहसोहळा संपन्न झाला होता. या विवाहसोहळ्याला मोठ मोठ्या राजकिय नेत्यांनी तसेच प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे विवाहसोहळ्यात बॉलिवूड कलाकारही आले होते.
आता या दोघांच्या लग्नाची तीन वर्षे उलटून गेल्यानंतर अमित-मितालीला पूत्ररत्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या आनंदाने सर्व सीमारेषा पार केल्या आहेत. खास करुन राज ठाकरेंवर पडलेल्या आजोबाच्या जबाबदारीचा त्यांनी हसहसत स्विकार केला आहे.