Share

…अन् अमित ठाकरे औरंगाबादला येताना रस्ताच चुकले; पहा नक्की काय घडलं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे. औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर १ मे रोजी सभा घेण्याची घोषणा मनसेने केली होती. आता या सभेला पोलिसांनीही परवानगी दिली आहे.  (amit thackeray missed the road)

मनसेचे नेते या सभेची जय्यत तयारी करताना दिसून येत आहे. अनेक मसनेचे नेते या सभेसाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे देखील या सभेसाठी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे अमित ठाकरे देखील औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे.

राज ठाकरे सध्या दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहे. आज ते औरंगाबादकडे रवाना होणार आहे. पण त्यांच्याआधीच अमित ठाकरे औरंगाबादकडे रवाना झाले आहे. पण अमित ठाकरे औरंगाबादला जात असताना एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. ज्यामुळे मनसेचे कार्यकर्तेदेखील चिंतेत पडले होते.

अमित ठाकरे हे औरंगाबादमध्ये येताना रस्ता चुकले होते. त्यामुळे त्यांना तिथे जायचे होते, तिथे ते वेळेत पोहचू शकले नाही. मनसेचे कार्यकर्ते अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी हातात हार वगैरे घेऊन उभे होते, पण अमित ठाकरे वेळेत न आल्यामुळे कार्यकर्तेदेखील थकून गेले होते.

अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी कार्यकर्ते बाबा पेट्रोल पंपावर हजर झाले होते. तिथे कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती. पण अमित ठाकरे पेट्रोल पंपावर न जाता ते औरंगाबादच्या मुक्कामी स्थळी पोहचले. ही सगळी गडबड त्या जीपीएसमुळे झाल्याची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली.

अमित ठाकरेंच्या कारला ट्राफिक नसलेला आणि जवळ असलेला रस्ता जीपीएसने दाखवला होता. त्यामुळे अमित ठाकरे त्या दिशेने रवाना झाले. पण त्यांचे कार्यकर्ते वेगळ्याच ठिकाणी उपस्थित असल्याने सगळेच गणित गडबडल्याचे दृश्य समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या-
औरंगाबादला जाताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेणार राज ठाकरे
कलिंगडमध्ये आहेत व्हाएग्राचे गुण; पुरुषांसाठी असलेले फायदे वाचून बसेल आश्चर्याचा धक्का
नवी मुंबईत तिरुपती देवस्थानला जागा देण्याच्या मागे शिवसेनेचा ‘हा’ मोठा राजकीय डाव? वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now