Share

महंमद शामीच्या पाठीशी उभा राहील्यामुळे अमित शहाच्या मुलाने विराटला राजीनामा द्यायला लावला; मंत्र्याचा गंभीर आरोप

नुकतीच भारताची दक्षिण आफ्रिकेविरुध्द कसोटी मालिका पार पडली. यामध्ये भारताच्या संघाचा दारूण पराभव झाला. भारताच्या या पराभवानंतर टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने अचानक पदाचा राजीनामा दिला, यामुळे विराटच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विराटच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्रातील मंत्र्याने बीसीसीआय वरती गंभीर आरोप केले आहेत.

विराटने हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला असेल पण त्याचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी आणि क्रिकेट जगताशी संबंधित अनेक खेळाडू आणि तज्ज्ञांसाठी अचानक धक्का देणारा आहे. विराटच्या या निर्णयावर अनेकांनी आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही एक भावनिक पोस्ट केली आहे. सचिन तेंडुलकरनेही आपली प्रतिक्रिया दिली असून, रोहित शर्मानेही विराटच्या या निर्णयाचा धक्का बसल्याचे ट्विट केले आहे. पण या सगळ्यात महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिक्रियेनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नितीन राऊत यांनी ट्विट केले की, “भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कप्तान विराट कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की क्रिकेट बोर्डातील “शाहजाद्यांचं” राजकारण फार घाण पातळीवर उतरलंय. महंमद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता.” त्यांनी हे ट्विट करत बीसीसीआय मधील काही लोकांवर निशाणा साधला आहे.

त्यांचे हे ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यांच्या ट्विटवरती प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तर दुसरीकडे, बीसीसीआयने विराट कोहलीच्या निर्णयाचा आदर करत त्याचे अभिनंदन केले आहे. क्रिकेट निवड समितीनेही त्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. विराटच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयने दिलेल्या अधिकृत निवेदनात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, खजिनदार अरुण सिंग धुमाळ आणि संयुक्त सचिव यांच्या नावाचा त्या पत्रावर समावेश आहे.

विराट कोहलीने टी-२० चं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यामध्ये वाद सुरू होता. कोहलीने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी कर्णधारपदाची सुरुवात केली. तेव्हापासून तो भारतीय संघाचा कर्णधार होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटी हा त्याच्या कर्णधारपदाचा शेवटचा सामना होता, ज्यात भारताचा सात विकेट्सनी पराभव झाला होता.

राजीनामा दिल्यानंतर विराटने ट्विट केलं होतं की, संघाला योग्य दिशेने नेण्यासाठी सात वर्षांची मेहनत आणि अथक परिश्रम घेत मी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आणि तिथे काहीही कमी पडू दिले नाही. प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर थांबली पाहिजे. माझ्यासाठी भारताचा कसोटी कर्णधार म्हणून आता थांबण्याची वेळ आलीय. मला माझ्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघाचा आभारी आहे. त्या सर्व सहकाऱ्यांचे ज्यांनी पहिल्या दिवसापासून मला पूर्ण पाठिंबा दिला. परिस्थिती कशीही असो मी कधीही हार मानली नाही.

महत्वाच्या बातम्या
आई म्हणाली, मी प्रेमात आहे, मुलांनी थाटामाटात लावून दिले तिचे दुसरे लग्न; मुंबईच्या मुलांचे देशभरात होतंय कौतूक
कर्णधारपद हा कोणाचा जन्मसिद्ध अधिकार नाही; क्रिकेटपटूने विराटला खडसावले
मोठी बातमी! अभिनेता धनुषने रजनीकांतच्या मुलीला दिला घटस्फोट; म्हणाला, इथून पुढे आपले रस्ते..

खेळ

Join WhatsApp

Join Now