Share

अमित शहा लवकरच समान नागरी कायदा मंजुरीसाठी आणतील, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

रत्नागिरीतील भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी समान नागरी कायद्याविषयी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. भाजप कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना, “लोकसभेप्रमाणेच राज्यसभेमध्येही बहुमत झाल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकरच बहुप्रतिक्षित समान नागरी कायदा मंजुरीसाठी आणतील” असा विश्वास पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, ‘‘राज्यसभेत भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची संख्या शंभर झाली आहे. त्यामुळे आता राज्यसभेतही पक्षाचे बहुमत झाले आहे. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेमध्येही बहुमत झाल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकरच बहुप्रतिक्षित समान नागरी कायदा मंजुरीसाठी आणतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे केंद्र सरकार समान नागरी कायदा बहुमतांनी मंजूर करून घेईल,’’

तसेच, राज्यसभेमध्ये १९८८ नंतर प्रथमच कोणत्याही एका पक्षाचे १०० खासदार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ७ वर्षांत अनेक निर्णय हे हिंदुस्थानाच्या राष्ट्रवादी विचारधारेनुरूप घेतले असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. पुढे बोलताना, श्री प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर निर्माण उपक्रम, काश्मीरचा स्वतंत्र दर्जा रद्द करणारे ३७० कलम हटविणे.

ते करताना काश्मीरच्या विभाजनाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. इतकेच नव्हे तर, आर्थिक निकषांवर आधारित १० टक्के आरक्षण दिले आहे. काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा विकास, असे अनेक निर्णय हिंदुस्थानातील बहुसंख्य राष्ट्रप्रेमी जनतेच्या मतानुसार घेतले आहेत. जनमाणसांमध्ये या निर्णयामुळे कमालीचा आनंद आणि समाधानाचे वातावरण असल्याचे पटवर्धन यांनी म्हटले आहे.

याबरोबरच, याचेच प्रत्यंतर चार राज्यांमधील विधानसभांमध्ये भारतीय जनता पक्षाला प्राप्त झालेल्या विजयामुळे आले आहे. आता बहुप्रतिक्षित समान नागरी कायदा मंजूर व्हावा, अशी देशवासियांची मागणी आहे. हे विधेयक लवकरच मंजूर होईल असा विश्वात पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

यापूर्वी दिपक पटवर्धन एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावेळी चर्चेत आले होते. त्यांनी आघाडी सरकारविरोधात आवाज उठवत आमरण उपोषणाची घोषणा केली होती. सरकार झोपले आहे तिला आता उठवण्याची गरज असल्याचे पटवर्धन यांनी म्हटले होते. आता समान नागरी कायद्याविषयी वक्तव्य केल्यामुळे पटवर्धन पुन्हा चर्चेत आले आहेत.

महत्वाच्या बातम्या
इंधनाचे दर वाढवणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी, सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला घरचा आहेर
श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या सुनेनं कुटुंबियांसोबत सोडला देश, श्रीलंका आता वाऱ्यावर, लोकं संतापले
मोदींच्या गुजरातमध्ये आपचे ‘इतके’ उमेदवार निवडणूक येणार, सर्वेक्षणातून मोठी माहिती समोर
मशिदींवरील भोंग्यावरून वंचित – मनसेत जुंपली! राज ठाकरेंना अटक होणार? वंचितने थेट प्रसिद्धीपत्रक काढून केले गंभीर आरोप

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now