Share

‘सर 300 रुपये गुगल पे करा, गर्लफ्रेंडला फिरायला न्यायचंय’, अमित मिश्रा 500 रुपये पाठवत म्हणाला..

भारतीय क्रिकेट संघाचा माजी लेगस्पिनर अमित मिश्रा सध्या सोशल मीडियावर खुप सक्रीय असतो. मिश्रा त्याच्या ट्विटर हँडलवर वेळोवेळी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो, जे लोकांना खूप आवडतात. अलीकडेच एका यूजरने अमित मिश्राला त्याच्या गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी 300 रुपये मागितले.

अमित मिश्राने क्षणाचाही विलंब न करता त्याला पैसै पाठवले. तेही 500 रुपये पाठवले आणि याचा स्क्रीनशॉटही त्याने शेअर केला. घडले असे की, भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळत आहे. रैनाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया लिजेंड्सविरूद्ध हवेत उडी मारत पॉइंटच्या दिशेने एक उत्तम कॅच घेतला.

रैनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अशा परिस्थितीत अमित मिश्रानेही हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आणि लिहिले, ‘भाई, सुरेश रैना, मी तुझ्याकडून टाईम मशिन घेऊ शकतो का? तुला जुन्या दिवसांप्रमाणे फिल्डींग करताना पाहून खूप आनंद होतो.

अमित मिश्राच्या या ट्विटवर एका युजरने लिहिले, ‘सर, 300 रुपये गुगल पे करा ना मला 2 गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जायचे आहे.’ त्याच्या या ट्विटवर दुसऱ्या एका युजरने लिहीले की, ‘तुमचा UPI पाठवा. यानंतर त्या मुलाने त्याचा यूपीआय शेअर केला. अमित मिश्राने त्या युजरला ५०० रुपये पाठवले.

मिश्राने 500 रुपयांच्या ट्रान्सफरचा स्क्रीन शॉटही शेअर केला आणि लिहिले, ‘डन, ऑल द बेस्ट फॉर द डेट.’ यानंतर युजरने अमित मिश्रा यांचे आभार मानले. अमित मिश्राने त्या मुलाला केलेली मदत पाहून युजर्स हैराण झाले. त्यांनी अमित मिश्राचे तोंडभरून कौतुक केले.

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या सेमीफायनल मॅचबद्दल बोलायचे झाले तर इंडिया लिजेंड्सने ऑस्ट्रेलिया लीजेंड्सचा 5 गडी राखून पराभव केला आणि फायनलचे तिकीट मिळवले. या सामन्यात नमन ओझाने इंडिया लिजेंड्सकडून नाबाद 90 धावांची खेळी केली.

महत्वाच्या बातम्या
Amitabh Bachchan: रेखा किंवा जया नाहीये अमिताभ यांचे पहिले प्रेम, ‘या’ बंगाली तरूणीवर फिदा झाले होते बीग बी
optical illusion: ‘या’ फोटोत लपलेल्या दोन पक्षांना शोधण्यासाठी पाहिजे तीक्ष्ण नजर, ९९% लोकं झालेत फेल, तुम्हाला दिसतायत का?
Bacchu Kadu : “त्यांना मंत्रिमंडळात योग्य स्थान न मिळाल्याने त्यांचं मन विचलित झालेलं आहे”; भाजप नेत्याचा बच्चू कडूंना टोला

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now