Share

Amit Deshmukh: “सैयारा तू तो बदला नहीं है… मौसम जरा सा रूठा हुआ है” या गाण्याचा उल्लेख करत आमदार अमित देशमुख यांची भाजप आणि राष्ट्रवादीवर खोचक टीका

Amit Deshmukh: लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी अहमदपूरमधील सभेत भाषण करताना एका लोकप्रिय गाण्याच्या ओळींचा उल्लेख करून महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांना भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)—खोचक शब्दांत लक्ष्य केलं. “सैयारा तू तो बदला नहीं है… मौसम जरा सा रूठा हुआ है” या गाण्याचा रूपक वापरत त्यांनी दोन्ही पक्षांतील मतभेद आणि ‘गद्दारी’च्या आरोपांवर उपहासात्मक टिप्पणी केली.

सध्या सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांच्यात ‘गद्दारी’च्या आरोपांचं युद्ध सुरू आहे. हे मुद्दे तापलेल्या राजकारणात काँग्रेसची एन्ट्री करत अमित देशमुखांनी भर सभेत स्पष्ट प्रश्न उपस्थित केला.“ज्यांच्या नेत्यांमध्येच एकमेकांना गद्दार म्हणण्याची स्पर्धा आहे, त्या पक्षांच्या मागे अहमदपूरकरांनी का जावं?”

अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी बाबासाहेब पाटील यांच्यावर “नगरपालिका निवडणुकीत खुलेआम गद्दारी केली” असा थेट आरोप करत, “गद्दारांना क्षमा नाही”, असा संदेश कार्यकर्त्यांना दिला.

यावर प्रतिक्रिया देताना अमित देशमुख म्हणाले की, महायुतीतील पक्षांमध्येच अविश्वास वाढला आहे, आणि अशा परिस्थितीत मतदारांनी कोणावर भरोसा ठेवावा ही खरी शंका आहे. न्यायालयातील ‘चिन्ह’ प्रकरण  देशमुखांचा मतदारांना इशारा अमित देशमुख यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांना देखील टोला . त्यांच्या मते, घड्याळ आणि धनुष्यबाण या चिन्हांचा वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. न्यायप्रविष्ट चिन्हांवर मतदान करणे हा न्यायालयाचा अवमान ठरू शकतो. दोन्ही पक्षांचं राजकीय भविष्यच सध्या अनिश्चित आहे. यावर त्यांनी मतदारांना स्पष्ट सल्ला दिला. “ज्या पक्षाचं उद्याचं अस्तित्वच अंधारात आहे, त्या भानगडीत पडू नका.” अमित देशमुखांच्या या टीकास्त्रामुळे अहमदपूरमधील वातावरण आणखी तापलं असून, ‘गद्दारी’ हा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीत प्रमुख चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार हे निश्चित आहे.

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now