Aamir Khan | आमिर खान जेव्हा जेव्हा चित्रपट बनवतो तेव्हा तो मेहनतीने काम करतो. स्क्रिप्टिंगपासून ते दिग्दर्शन आणि गाण्यांपर्यंत तो प्रत्येक पैलूवर काम करतो. मग ते प्रमोशन असो वा दुसरं काही. प्रमोशनच्या रणनीतीतही तो खुप हातभार लावतो. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा आमिर खान गेल्या काही काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होऊ शकला नाही.
ठग्स ऑफ हिंदोस्तान फ्लॉप झाल्यानंतर तो लाल सिंग चड्ढासोबत आला, पण तो प्रेक्षकांच्या कसोटीवर टिकू शकला नाही. बराच वेळ घेऊन हा चित्रपट बनवला गेला. हॉलिवूडपट फॉरेस्ट गंपचे हक्क विकत घेण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.
त्यानंतर हा चित्रपट बनवताना त्याने खूप घाम गाळला होता. पण हा चित्रपट पाच दिवसांत केवळ ४८ कोटींची कमाई करू शकला आहे. आता आमिर खानशी संबंधित सूत्र सांगत आहेत की चित्रपटाची कामगिरी चांगली न झाल्यामुळे अभिनेता शॉकमध्ये आहे.
त्याने वितरकांचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलीवूड हंगामाच्या अहवालात असे म्हटले आहे की, आमिर खान आणि त्याची माजी पत्नी किरण राव यांच्या जवळच्या मित्राने सांगितले की आमिर खानला धक्का बसला आहे आणि प्रेक्षकांनी चित्रपट नाकारल्याने त्याच्यावर वाईट परिणाम झाला आहे.
त्यांनी हा चित्रपट मोठ्या जोमाने बनवला होता. इतकंच नाही तर चित्रपटाच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली असून वितरकांचे झालेले मोठे नुकसान भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खानच्या अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंह चड्ढा’ने गुरुवारी 11.7 कोटी, शुक्रवारी 7.26 कोटी, शनिवारी 9 कोटी, रविवारी 10 कोटी आणि 15 ऑगस्ट म्हणजेच सोमवारी 8 ते 9 कोटींचा व्यवसाय केला.
अशा प्रकारे या चित्रपटाने जवळपास 47 कोटींचा व्यवसाय केला आहे. आमिर खानशिवाय या चित्रपटात करीना कपूर, मोना सिंग आणि नागा चैतन्य मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट न चालण्यामागे अनेक कारणे आहेत. सोशल मिडीयावर लोकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. यादरम्यान आमिर खानचे काही जुने व्हिडीओ व्हायरल झाले होते.
महत्वाच्या बातम्या
राज्याचे नवीन शिक्षणमंत्री दीपक केसरकराचं शिक्षण किती झालंय माहिती का? वाचून आश्चर्य वाटेल
Gulabrao Patil : ‘उंदराला सापडली चिंधी, इकडे ठेवू की तिकडे ठेवू’, गुलाबराव पाटलांचा राऊतांना टोला
Panchand meghwal : दलितांवर होणारे अत्याचार पाहून काँग्रेस आमदाराचे मन दुखावले, दिला राजीनामा
विनायक मेटेंच्या अपघात प्रकरणाला वेगळं वळण, धक्कादायक माहिती आली समोर