शिवजयंती आली की, राज्यात राजकीय वातावरण तापत हे आता काही नवीन नाही. राज्यात शिवजयंती तारीख आणि तिथी अशा दोनही प्रकारे साजरी केली जाते. यावरूनच आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही मराठी माणसांसाठी सण आहे.
हा सण तिथीनुसार साजरा करायला हवा असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी २१ मार्चची शिवजयंती जल्लोषात साजरी करा असं आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार मनसेकडून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर अश्वारुढ शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पवृष्टी साजरी करण्यात आली.
तसेच शिवसेना शिवजयंतीबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ठाकरे यांनी राज्य सरकारच्या अधिकृत निर्णयानुसार मुख्यमंत्री या नात्याने १९ फेब्रुवारी शिवजंयती साजरी केली. तर तिथीनुसार शिवजंयती साजरी करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेनुसार शिवसेनाप्रमुख या नात्याने सोमवारी देखील शिवजयंती साजरी केली.
तर याच मुद्यावरून मनसे नेत अमेय खोपकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान आपापसात भिडले होते. ‘मिटकरी फालतू राजकारण करू नका, अक्कल आहे का तुम्हाला दरवेळेस तुमचं हेच असतय, कसल्या गोष्टीचं राजकारण करता, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, असे अमेय खोपकर यांनी म्हटले.
‘तुमची अक्कल किती आहे, हे मला माहितेय, असा पलटवार मिटकरी यांनी केला होता. तसेच त्यातूनच, मिटकरी आणि मनसेचे अमेय खोपकर यांच्या शाब्दीक खडाजंगी पाहायला मिळाली. अजूनही यांच्यातील वाद शमलेला नाहीये. अमेय खोपकर यांनी ट्विट करत पुन्हा मिटकरी यांना डिवचले आहे.
तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 22, 2022
ट्विट करत खोपकर म्हणतात, “तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत,” अशा तिखट शब्दात त्यांनी मिटकरी यांना लक्ष केले आहे.
माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे l
कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही ll— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 22, 2022
खोपकर यांच्या टीकेला मिटकरी यांनीदेखील ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. ‘माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे l कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही,” अशा शब्दात खोपकर यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. तसेच शिवजयंतीवरून खोपकर-मिटकरींमध्ये ट्विटर वॉर चांगलाच रंगला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘मला कपडे काढून नाचण्यास सांगितले’, अभिनेत्रीचा काश्मीर फाइल्सच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप
स्वप्न पुर्ण करण्यासाठी रस्त्यावर धावणाऱ्या प्रदीपची मदत करण्यास महिंद्रांचा साफ नकार; म्हणाले, तो एक…
देशातील प्रसिद्ध हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाची धाड; २४ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु
लवकरच ‘या’ स्टॉकची किंमत होणार झिरो, तुमच्याकडेही असेल तर नाही मिळणार एक पैसा