Share

स्टेडियमची वीज गेल्यामुळे मुंबईची झाली चांदी, सोशल मिडीयावर अंबानींचे भन्नाट मीम्स व्हायरल

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ मध्ये, गुरुवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात सामना झाला. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना वीज खंडित आणि तांत्रिक समस्येमुळे चर्चेत होता. सीएसकेचा फलंदाज डेव्हन कॉनवे यालाही पॉवरकटचा फटका सहन करावा लागला.(Ambani’s abandoned memes go viral on social media)

खरतर, सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर डॅनियल सॅम्सने CSKचा सलामीवीर डेव्हन कॉनवे (० धावा) याला एलबीडब्ल्यू आऊट केले. वीज खंडित झाल्यामुळे त्यावेळी डीआरएस उपलब्ध नसल्याने कॉन्वे डीआरएस वापरू शकत नव्हते. नंतर, रिप्ले पाहिल्यानंतर, चेंडू लेग-स्टंपला लागण्यापासून मिस झाला असल्याचे आढळले. अशा परिस्थितीत डीआरएस असता तर कॉनवे बाहेर पडण्यापासून वाचला असता.

सोशल मीडियावर चाहते पॉवरकटला घेऊन बीसीसीआयवर टीका करत आहेत. यासोबतच यासंदर्भात मीम्सचाही वर्षाव झाला आहे. या सामन्यापूर्वी डेव्हॉन कॉनवे अतिशय धोकादायक फॉर्ममध्ये होता. या सामन्यापूर्वी त्याने नाबाद ८५, ५६ आणि ८७ धावांची खेळी खेळली होती.

https://twitter.com/ShrirangSaraf/status/1524762568870428672?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1524762568870428672%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fiplt20%2Fnews%2Fipl-2022-memes-went-viral-after-power-cut-at-wankhede-stadium-during-csk-vs-mi-match%2Farticleshow%2F91522564.cms

https://twitter.com/ProtonTanmay/status/1524757287591497728?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1524757287591497728%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fiplt20%2Fnews%2Fipl-2022-memes-went-viral-after-power-cut-at-wankhede-stadium-during-csk-vs-mi-match%2Farticleshow%2F91522564.cms

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जचा डाव अवघ्या १६ षटकांत ९७ धावांवर आटोपला. कर्णधार एमएस धोनीने सर्वाधिक नाबाद 36 धावा केल्या. याशिवाय ड्वेन ब्रेव्ह (१२ धावा) आणि शिवम दुबे (१० धावा) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. मुंबईकडून डॅनियल सॅम्सने सर्वाधिक तीन खेळाडूंना आउट केले. त्याचवेळी कुमार कार्तिकेय आणि रिले मेरेडिथ यांना प्रत्येकी दोन यश मिळाले.

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात डेव्हॉन कॉनवेला चेन्नई सुपर किंग्जने एक कोटी रुपयांना विकत घेतले. कॉनवे प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होत आहे. ३० वर्षीय कॉनवेने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून न्यूझीलंडसाठी सात कसोटी, तीन एकदिवसीय आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
मुकेश अंबानीने लाईट घालवून मुंबईला जिंकवलं; चेन्नईचे फॅन्स तापले, भन्नाट मीम्स व्हायरल
चेन्नईचा ९७ धावांत उडवला खुर्दा; धडाकेबाज विजय मिळवत मुंबई इंडीयन्सने बदला घेतला
मोठा धक्का! मुंबईने ९७ धावांवरच चेन्नईला ऑलआऊट करत जिंकला सामना, चेन्नईचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं
रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये वाद, संघ व्यवस्थापन जडेजाला बाहेरचा रस्ता दाखवणार?

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now