Share

‘एकटा 32 वर्षाचा पोरगा तुमच्या अख्ख्या राजकीय कारगीर्दीला घोडे लावतोय, ते बी नांगरासकट’

aditya thackeray
राज्यात शिंदे – भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेलं पावसाळी अधिवेशन हे चांगलच चर्चेत आलं. शेवटच्या दिवसापर्यंत राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र पाहायला मिळाले. आज शेवटच्या दिवशी शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना चांगलेच लक्ष केले.

आज देखील सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी माजी मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनावेळी सत्ताधारी नेत्यांच्या हातात एक पोस्टर पाहायला मिळालं.

यावर आदित्य ठाकरेंचं व्यंगचित्र पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेंची दिशा चुकली. पर्यवरण खातं त्यांनी घरात राहून सांभाळलं, अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.  आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) घोड्यावर उलटे बसलेले दिसत आहेत. या बॅनरवर आदित्य ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा केला आहे.

यावरून आता राजकारण तापलं आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला लक्ष केलं आहे. फेसबुक पोस्ट करत दानवे यांनी आदित्य ठाकरेंची बाजू घेत शिंदे गटाला धारेवर धरले आहे. ‘एकटा 32 वर्षाचा पोरगा तुमच्या अख्ख्या राजकीय कारगीर्दीला  घोडे लावतोय ते बी नांगरासकट,’ असं दानवे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

दानवे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की, ‘एकटा 32 वर्षाचा पोरगा तुमच्या अख्ख्या राजकीय कारगीर्दीला  घोडे लावतोय ते बी नांगरासकट, सत्ताधारी असून पायरीवर विरोध करायला बसवलय वाघाने..एकंदरीत आदित्यजी योग्य राजकीय मार्गावर आहेत, असं दिसतंय.’

भाजप नेत्यांनी केली आदित्य ठाकरेंवर जहरी टिका..!

दरम्यान, भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंना लक्ष केलं आहे. “‘युवराजांची कायमच दिशा चुकली’ असे पोस्टर हातात घेऊन शिंदे गटाची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी. एकदा “दिशा” चुकली की दाही दिशा फिरावे लागते” असं भातखळकर यांनी म्हंटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
तिकिटासाठी पैसे नाहीत, म्हणून तरुणाने एसटीच्या पाठीमागे लटकून केला प्रवास; पाहा फोटो
नवऱ्यासाठी निर्जळी उपवास अन् वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा…; अभिनेत्रीने महीलांना दिला ‘हा’ सल्ला
राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्याने केलं ‘हे’ हैराण करणारं काम, बाळा नांदगावकरांनीही केलं कौतूक

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now