काल देखील सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी माजी मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनावेळी सत्ताधारी नेत्यांच्या हातात एक पोस्टर पाहायला मिळालं.
यावर आदित्य ठाकरेंचं व्यंगचित्र पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेंची दिशा चुकली. पर्यवरण खातं त्यांनी घरात राहून सांभाळलं, अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) घोड्यावर उलटे बसलेले दिसत आहेत. या बॅनरवर आदित्य ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा केला आहे.
यावरून आता राजकारण तापलं आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला लक्ष केलं आहे. फेसबुक पोस्ट करत दानवे यांनी आदित्य ठाकरेंची बाजू घेत शिंदे गटाला धारेवर धरले आहे. ‘एकटा 32 वर्षाचा पोरगा तुमच्या अख्ख्या राजकीय कारगीर्दीला घोडे लावतोय ते बी नांगरासकट,’ असं दानवे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
दानवे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की, ‘एकटा 32 वर्षाचा पोरगा तुमच्या अख्ख्या राजकीय कारगीर्दीला घोडे लावतोय ते बी नांगरासकट, सत्ताधारी असून पायरीवर विरोध करायला बसवलय वाघाने..एकंदरीत आदित्यजी योग्य राजकीय मार्गावर आहेत, असं दिसतंय.’
भाजप नेत्यांनी केली आदित्य ठाकरेंवर जहरी टिका..!
महत्त्वाच्या बातम्या
तारक मेहता..च्या बबिताजींनी बनारसी साडी आणि केसात गजरा लावून घातला धुमाकूळ, चाहते झाले वेडे, पहा फोटो
नेहमी शांत संयमी असणारे नितीन गडकरी का संतापले? म्हणाले त्यांना मी सोडणार नाही…