Share

आश्चर्यकारक! लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरीने दिला बाळाला जन्म, तरीही धुमधडाक्यात लावून दिले तिचे लग्न

ऐकावे ते नवलच, लग्नाच्या एक दिवस आधीच नवरी मुलीने मुलाला जन्म दिला आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच नवरी मुलीच्या पोटात दुखू लागले. डॉक्टरकडे नेताच तिने मुलाला जन्म दिला. लग्नाच्या आधीच नवरी मुलीने मुलाला जन्म दिल्याने आई वडील आणि नातेवाईकांनी पुढे जे केले वाचून तुम्ही थक्क व्हाल…

छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यातील ही घटना आहे. बदराजपूर ब्लॉक अंतर्गत बांसकोट गावात लग्नाच्या एक दिवस आधी हळदीच्या विधीदरम्यान एका नववधूने मुलाला जन्म दिला. मात्र लग्नाशिवाय मूल झाले यावर कुटुंबीयांनी विरोध केला नाही, उलट दुहेरी आनंदात कुटुंबाने वधू-वराच्या लग्नाची तयारी सुरू केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बराराजपूरमधील बांसकोट येथील रहिवासी असलेल्या शिवबत्तीचा विवाह 31 जानेवारी रोजी ओडिशातील रहिवासी चंदन नेतामसोबत होणार होता. 30 जानेवारीला हळदीचा कार्यक्रम होता, मध्येच मुलीच्या पोटात दुखू लागले. वधूला घरापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र बांसकोट येथे तपासणीसाठी नेण्यात आले. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वधूने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माने कुटुंबात दुहेरी आनंद होता, त्यानंतर कुटुंबाने दुसऱ्या दिवशीचे लग्न धुमधाममध्ये लावले.

आता मुलीच्या लग्नाआधीच तिला झालेले मूल पाहून सुद्धा कुटूंबीयांनी लग्न लावून का दिले हे वधूच्या आईला विचारले असता तिने सांगितले की, आदिवासी समाजात चालणाऱ्या पैठू प्रथेप्रमाणे तिची मुलगी 2021 मध्ये तिच्या आवडत्या मुलाच्या घरी पैठूला गेली होती आणि आता त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लग्नादरम्यान त्यांच्या मुलीने मुलाला जन्म दिला.

आता नेमकी पैठू प्रथा काय याबद्दल जाणून घेऊ. लिव्ह इन रिलेशनशिपचे नाव तुम्ही ऐकले असेल पण पैठू सिस्टीमबद्दल तुम्हाला फारसे माहिती नसेलच. याबद्दल सांगायचे झाल्यास, या दोन्ही गोष्टी जवळ जवळ सारख्याच आहेत. ज्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत.

आदिवासी समाजात पैठूची प्रथा आजही प्रचलित आहे, त्यात लग्नाआधी मुलगी तिच्या पसंतीच्या मुलाच्या घरी जाते आणि मुलगा आणि मुलगी या दोघांच्याही घरच्यांचा याबद्दल काही आक्षेप नसतो. पैठू मिळाल्यानंतर म्हणजेच मूल जन्माला आल्यानंतर शुभ मुहूर्त पाहून दोघांचे कुटुंबीय त्यांचे लग्न लावून देतात.

इतर

Join WhatsApp

Join Now